Girish Mahajan : ‘लायकी नसताना पक्षानं एकनाथ खडसेंना पद दिलं’, गिरीश महाजनांचा घणाघात; मानसिक संतुलन बिघडल्याचाही टोला

गृहमंत्रालयाचा हिसका दाखवा, असं आवाहनच त्यांनी शरद पवारांना केलं होतं. त्यावर गिरीश महाजन यांनी खडसेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. लायकी नसताना पक्षानं एकनाथ खडसेंना पद दिलं, असा घणाघात महाजनांनी केलाय.

Girish Mahajan : 'लायकी नसताना पक्षानं एकनाथ खडसेंना पद दिलं', गिरीश महाजनांचा घणाघात; मानसिक संतुलन बिघडल्याचाही टोला
एकनाथ खडसे, गिरीश महाजनImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 5:50 PM

पुणे : जळगावमध्ये दोन माजी मंत्र्यांमधील वैर काही केल्या कमी होताना दिसत नाही. पु्र्वाश्रमीचे भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार गिरीश महाजन यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तर गिरीश महाजनही (Girish Mahajan) एकनाथ खडसेंचा एकही वार फुकट जाऊ न देता त्याला जोरदार प्रत्युत्तर देत असतात. जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी विरोधकांना अद्दल घडवण्याची भाषा केली होती. गृहमंत्रालयाचा हिसका दाखवा, असं आवाहनच त्यांनी शरद पवारांना केलं होतं. त्यावर गिरीश महाजन यांनी खडसेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. लायकी नसताना पक्षानं एकनाथ खडसेंना पद दिलं, असा घणाघात महाजनांनी केलाय.

‘लायकी नसताना खडसेंना पदं दिली’

खडसेंवर टीका करताना महाजन म्हणाले की, लायकी नसताना पक्षानं एकनाथ खडसेंना पदं दिली. ग्रामपंचायतमध्ये पडले. नगरपालिकेत आमचा महापौर आहे. मुलगी विधानसभेला उभी राहिली आणि पडली. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असेल तर ग्रामपंचायतीला पडतो का? असा खोचक सवाल महाजनांनी केलाय. खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यांचं भाषण मी ऐकलं, म्हणाले दोन चार मानणांना जेलमध्ये टाका. एखादा विक्षिप्त माणूसच असं करू शकतो, अशी टीकाही महाजनांनी केलीय.

खडसेंची नेमकी टीका काय?

शरद पवारांच्या जळगाव दौऱ्यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. राज्यात सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप यावेळी खडसेंनी भाजपवर केला होता. त्यावेळी खडसेंनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिलेला सल्लाही चर्चेचा विषय ठरतोय. वळसे पाटलांना अनेकदा सांगतो, की गृहमंत्रीपद जे आहे, त्याचा दाखवा एकदा हिसका, दाखवा एकदा इंगा, असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय. शेकडो प्रकरणं यांची आहेत. दोन चार लोकांना वर्षापूर्वीच टाकून दिलं असतं, तर ही परिस्थिती आली नसती, असंही खडसे म्हणाले.

नेमकं काय म्हणाले?

जयंत रावांना मी सांगत होतो की तुम्ही फार साधेभोळे आहात. वळसे पाटलांना अनेकदा सांगतो की गृहमंत्रीपद जे आहे, त्याचा दाखवा एकदा हिसका.. दाखवा एकदा इंगा… शेकडो प्रकरण ह्यांची आहेत. दोन चार लोकांना वर्षापूर्वी टाकून दिलं असतं, तर ही परिस्थिती आली नसती. जे सत्य आहे ते करा… पण जे त्यांनी केलं आहे ते त्यांना भोगायला लावा.. हे काय चाललंय.. देशमुखांच्या घरावर शंभर शंभर धाडी पडतात.. व्यवहार किती कोटी रुपयांचा..कोट्यवधींच्या घोटाळ्याचे आरोप करता…काय कोटी रुपयांचं.. ते म्हणतात अरे तूम तो जेल मे जाने वाले है… अरे हम जेल जाएंगे तो जाएंगे.. हम डुबेंगे तो सनम तुमको भी लेकर डुबेंगे सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत राहता.. सरकारलाही विनंती करतोय.. की सत्य आहे, ते बाहेर आणलं पाहिजे.. पवार साहेबांनाही मी ही विनंती करणार.

इतर बातम्या :

Raj Thackeray : राज ठाकरेंना केंद्राची सुरक्षा? हालचाली सुरू; राज यांचे महत्त्व वाढवण्याचे प्रयत्न?

Pune Girish Mahajan : भाजपाकाळात एक दिवसही भारनियमन करावं लागलं नाही, वीजप्रश्नी गिरीष महाजनांची पुण्यात महाविकास आघाडीवर टीका

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.