सुजय विखेंशी काय चर्चा झाली? गिरीश महाजन म्हणतात…

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजप नेते व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या घरी जाऊ भेट घेतली. त्यामुळे अर्थात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र, या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. सुजय विखेंसोबतच्या भेटीनंतर […]

सुजय विखेंशी काय चर्चा झाली? गिरीश महाजन म्हणतात...
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजप नेते व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या घरी जाऊ भेट घेतली. त्यामुळे अर्थात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र, या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

सुजय विखेंसोबतच्या भेटीनंतर गिरीश महाजन काय म्हणाले?

“सुजय विखे पाटील आज घरी आले होते. एक तास आमच्यात चर्चा झाली. पण कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. ते त्यांच्या मेडिकलच्या कॉलेज संदर्भात आलेले. विरोधी पक्षनेत्याच्या मुलाने दुसऱ्या पक्षात जाऊ नये असं काही नाही.”, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

तसेच, “आज मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यांची मतं भिन्न आहेत. मुलायमसिंग मोदींना शुभेच्छा देतात. त्यामुळे आता असं काही नाही ज्याला जे योग्य वाटेल त्याने ते करावं.”, असेही गिरीश महाजन म्हणाले.

सुजय विखे-गिरीश महाजन भेट, राजकीय वर्तुळात खळबळ

सुजय विखे पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आहेत. दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्याने, सुजय विखे यांची मोठी गोची झाली आहे. कारण दक्षिण अहमदनगर लोकसभेची जागा आघाडीच्या परंपरेनुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला येते आणि यावेळीही राष्ट्रवादी ही जागा सोडण्यास तयार नाही.

दक्षिण नगरच्या लोकसभा जागेसाठी राष्ट्रवादी ठाम आहे. त्यामुळे आघाडीत ज्या दोन-तीन जागांबाबत अद्याप तिढा आहे, त्यात दक्षिण नगरच्या जागेचा समावेश आहे. किंबहुना, याच जागेवरुन सर्वाधिक तिढा आहे. त्यात थेट विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या मुलानेच निवडणूक लढण्यासाठी इच्छा व्यक्त केल्याने काँग्रेसचीही मोठी गोची झाली आहे. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीही जागा सोडण्यास तयार नाही.

त्यात आता सुजय विखे यांनी भाजपच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरु केल्याने, काँग्रेस-राष्ट्रवादीवर आपसूक दबाव वाढणार आहे. त्यामुळे भाजप नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतच्या बैठकीत लोकसभा जागेसंदर्भात सुजय विखेंनी चर्चा केली असो वा नसो, आघाडीच्या जागावाटपावर या भेटीचा नक्कीच परिणाम होईल. शिवाय, या भेटीमुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आणलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.