Special Report | गिरीश महाजनांकडे खडसेंचे कुठले कारनामे आहेत?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांचे कट्टर राजकीय विरोधक भाजप नेते गिरीश महाजन यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय.
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांचे कट्टर राजकीय विरोधक भाजप नेते गिरीश महाजन यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. रस्त्यांच्या निकृष्ठ कामांवरुन या दोघांमध्ये पुन्हा वाकयुद्ध सुरु झालंय. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना कारनाम्यांचा उल्लेख करत मोठा इशारा दिलाय. त्यावर खडसेंनी देखील प्रत्युत्तर दिलं. “मी काय भ्रष्टाचार केला? तुमच्यात हिंमत असेल तेवढे माझे कारनामे बाहेर काढा. मी तुमचे जे कारणानामे काढले आहेत ते खरे ठरले आहेत. तुमचे करोडो रुपयांचे भ्रष्टाचार आहेत. आधी त्यांच्या चौकशी करून जनतेसमोर या”, असं आव्हान खडसेंनी महाजनांना दिलंय. त्यांच्या या राजकीय वादाविषयी पाहा सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट!