Goa Assembly Election 2022 : काँग्रेस, आपच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, कुणाला कुठून संधी?
शनिवारीच निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. पुढच्या महिन्याभराचाच आता अवधी राजकीय पक्षांकडे उरलाय. अशात जागावाटप आणि तिकीट वाटपाला वेग आला असून आता सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारी लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे.
पणजी : निवडणुका जाहीर झाल्यानंतर काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांची दुसरी यादीही जाहीर केली आहे. आधीच राजकीय वातावरण तापलेलं असल्यामुळे अंतर्गत बंडाळी रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची तारेवरची कसरत गोव्यात पाहायला मिळते आहे. त्यात काँग्रेसनं आता आपल्या उमेदवारांची दुसरी यादीदेखील जारी केली आहे. दुसऱ्या यादीत काँग्रेसनं सात उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
दुसऱ्या यादीत काँग्रेसकडून कुणाकुणाला कुठून संधी?
पेडणे – जितेंद्र गावकर, सांताक्रूख – रुडॉल्फ लुईस फर्नांडिस कुंभारजुवा – राजेश फळदेसाईन वाळपई – मनिषा शेणवी उसगावकर दाभोळी – कॅप्टन विरीएटो फर्नांडिस कडतरी – ऑलेन्सिओ सिमन्स नावेली – आवरतो फुर्तादो
दरम्यान, काँग्रेसच्या यादी आधी आज आपचीही दुसरी यादी जारी करण्यात आली आहे. तसंच गोव्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून गोव्यातील सांगे मतदारसंघाचे अपक्ष आमदार यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रसाद गावकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर त्यांनी आपल्या आमदारीकचा राजीनामा देऊन आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे आपनंही आपल्या यादीत दहा उमेदवारांची नावं जाहीर केली आहे.
कोणत्या मतदारसंघात आपचा कोण उमेदवार?
सांतआंद्रे – रामाराव वाघ कळंगुट सुदेश मयेकर ताळगाव- सिसिल रॉड्रिग्स मये – राजेश कळंगुटकर कुंकळ्ळी – प्रशांत नाईक म्हापसा – राहुल म्हांबरे वेळ्ळी- क्रूझ सिल्वा काणकोण – अनुप कुडतरकर सावर्डे – अनिल गावकर फातोर्डा – संदेश तळेकर
शनिवारीच निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. पुढच्या महिन्याभराचाच आता अवधी राजकीय पक्षांकडे उरलाय. अशात जागावाटप आणि तिकीट वाटपाला वेग आला असून आता सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारी लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे. गोवा विधानसभा मतदारसंघात एकूण 40 मतदारसंघ असून सध्या गोव्यात भाजपची सत्ता आहे. येत्या 14 फेब्रुवारीला गोव्यात विधानसभेचा मतदान पार पडणार असून 10 मार्च रोजी या मतदाराना निकाल जाहीर होणार आहे.
Goa needs Change.. Vote for AAP#EkChanceKejriwalak pic.twitter.com/Zk75JGrwZg
— Aam Aadmi Party Goa (@AAPGoa) January 9, 2022
गोव्यातील सध्याचं पक्षिय बलाबल काय आहे?
गोवा एकूण जागा 40
भाजपा 17 कॉंग्रेस 13 महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष 3 गोवा फॉरवर्ड – 3
LIVE: Induction of Ex Sanguem Independent MLA Prasad Gaonkar into Congress Partyhttps://t.co/OhM9xl3XAX
— Goa Congress (@INCGoa) January 9, 2022
इतर बातम्या –
मला ठाण्याला दाखवायची गरज नाही पण महाजनांना बुधवार पेठेत दाखवा-एकनाथ खडसे
Video : ‘घर की मुर्गी दाल बराबर’, शिवसेना आमदाराची नाराजी जाहीर व्यासपीठावर उघड