प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री – सूत्र
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल (17 मार्च) निधन झालं. त्यानंतर आज पर्रिकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. मात्र, अंत्यसंस्कारापूर्वीच गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्याचं नाव निश्चित झालं . कारण गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या. पर्रिकरांवर अंत्यसंस्कार होण्याचीही वाट न पाहता, राजकीय गणित जुळवण्यास काँग्रेस आणि भाजपने सुरुवात केली. LIVE UPDATE […]
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल (17 मार्च) निधन झालं. त्यानंतर आज पर्रिकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. मात्र, अंत्यसंस्कारापूर्वीच गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्याचं नाव निश्चित झालं . कारण गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या. पर्रिकरांवर अंत्यसंस्कार होण्याचीही वाट न पाहता, राजकीय गणित जुळवण्यास काँग्रेस आणि भाजपने सुरुवात केली.
LIVE UPDATE :
- प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री – सूत्र
- रात्री 9 च्या सुमारास नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी
- गोव्यात नव्या मंत्रिमंडळाचा आजच शपथविधी
- डॉ. प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री होणार, सूत्रांची माहिती, भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत निर्णय
- भाजपच्या प्रमोद सावंत यांच्या नावाला मगोपचा विरोध, मगोपचे गोव्यात तीन आमदार
- पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात दाखल
- डॉ. प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री होणार – सूत्र
- गोव्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला संधी मिळावी, आमच्याकडे बहुमत आहे – गोवा काँग्रेस
- गोव्यात सत्ता स्थापनेचा आम्ही दावा केला आहे, आमच्याकडे बहुमत आहे – गोवा काँग्रेस
- काँग्रेसचं शिष्टमंडळ गोव्याच्या राज्यपालांना भेटलं, सत्ता स्थापनेचा काँग्रेसकडून दावा
- दुपारी 3 वाजण्याच्याआधीच गोव्यात नवीन मुख्यमंत्री
- काँग्रेस आमदारांना भेटण्यास गोव्याच्या राज्यपालांचा नकार
- गोव्यात सत्ता स्थापनेसाठी धडपड सुरु, काँग्रेसचे आमदार राज्यपालांच्या भेटीला
- गोव्यात सत्तास्थापनेसाठी काँग्रेस दावा करणार, सर्व 14 आमदार राज्यपालांची भेट घेणार, विरोधी पक्षनेते चंद्रकांत कुवळेकर यांची माहिती
- विश्वजित राणे यांचंही नाव गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत
- प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता, सावंत हे पर्रिकरांचे निकटवर्तीय
- काँग्रेसच्या आमदारांकडूनही राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा
- दुपारी 2 वाजेपर्यंत गोव्याच्या नव्या मुख्यमंत्री ठरणार, तर दुपारी 3 वाजल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा शपथग्रहण सोहळा होणार
कोण आहेत डॉ. प्रमोद सावंत?
- डॉ. प्रमोद सावंत हे गोव्यातील सांखळी मतदार संघाचे भाजपचे आमदार आहेत. सध्या ते गोवा विधानसभेचे अध्यक्ष आहेत.
- डॉ. प्रमोद सावंत यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी झाला.
- पांडुरंग सावंत आणि पद्मिनी सावंत अशी त्यांच्या आई-वडिलांची नावे आहेत.
- डॉ. प्रमोद सावंत हे व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
- त्यांनी गंगा शिक्षण संस्था कोल्हापूर येथून आयुर्वेदाची पदवी घेतली.
- त्यानंतर त्यांनी पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापिठातून त्यांनी समाजसेवेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं.
- त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत या रसायनशास्त्राच्या शिक्षिका आहेत. सध्या त्या गोव्याच्या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर काळाच्या पडद्याआड
गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 63 व्या वर्षी दीर्घ आजाराने मनोहर पर्रिकर यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून मनोहर पर्रिकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर कर्करोगाशी लढण्यात ते अपयशी ठरले. भारतीय राजकारणातील अत्यंत साधे आणि सुस्वभावी असं व्यक्तिमत्त्व मनोहर पर्रिकर यांच्या रुपाने काळाच्या पडद्याआड गेलं. मनोहर पर्रिकर यांच्या निधानाची माहिती भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरुन दिली.
संबंधित बातमी : गोव्यात ‘ही’ पाच नावं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत