Goa Political Crisis : गोव्यात मोठा राजकीय भूकंप; विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांना हटवलं; दिगंबर कामतांवरही कारवाई होणार

काँग्रेसच्या काही आमदारांची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत बैठकही झालीय. हे आमदार आज रात्री दिल्लीला जाण्याची शक्यता असून तिथे त्यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे. अशावेळी काँग्रेसनं मायकल लोबो यांना विरोधी पक्षनेतेपदावरुन हटवलं आहे. तर दिगंबर कामत यांच्यावरही पक्ष कारवाई करणार असल्याची माहिती मिळतेय.

Goa Political Crisis : गोव्यात मोठा राजकीय भूकंप; विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांना हटवलं; दिगंबर कामतांवरही कारवाई होणार
पक्षाच्या बैठकीला दांडी, मात्र बंडखोर म्हणतात आम्ही काँग्रेससोबतच, गोव्यात नेमकं चाललंय काय?
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 9:24 PM

मुंबई : महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातही मोठा राजकीय भूकंप (Political Earthquake) झालाय. गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेते मायकल लोबो (Michael Lobo) यांच्यासह काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांचाही समावेश आहे. मायकल लोबो आणि काँग्रेसच्या काही आमदारांची मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्यासोबत बैठकही झालीय. हे आमदार आज रात्री दिल्लीला जाण्याची शक्यता असून तिथे त्यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे. अशावेळी काँग्रेसनं मायकल लोबो यांना विरोधी पक्षनेतेपदावरुन हटवलं आहे. तर दिगंबर कामत यांच्यावरही पक्ष कारवाई करणार असल्याची माहिती मिळतेय.

भाजपमध्ये प्रवेशासाठी काँग्रेस आमदार आज रात्री दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने गोव्यात तयारी पाहायला मिळतेय. मात्र, काँग्रेसचे किती आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. महत्वाची बाब म्हणजे विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्यावर ठाम असल्याचं कळतंय. तर काही आमदार द्विधा मन:स्थितीत आहेत. तर काँग्रेसकडून आमदारांची मनधरणी केली जात असल्याची माहिती मिळतेय.

लोबो यांच्यासह 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार?

विरोधी पक्षनेते मायकल लोबो, काँग्रेस आमदार केदार नाईक आणि राजेश फळदेसाई हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह आठ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपच्या हायकमांडनेही या आमदारांना पक्षात घेण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे. अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी हे आठही आमदार एकत्रितपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गोवा विधानसभेची सदस्यसंख्या 40 आहे. काँग्रेसकडे 11, भाजपकडे 20, एमजीपीकडे दोन आणि तीन अपक्ष आमदार आहेत.

गोव्यातही महाराष्ट्राचा फॉर्म्युला ?

>> गोव्यातील काँग्रेसचे आमदार प्रत्यक्ष पक्षातून न फुटता विधानसभेत स्वतःचा एक गट तयार करण्याच्या तयारीत

>> काँग्रेस आमदारांचा हा गट गोव्यातील डॉ प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता

>> गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे

>> त्या पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय

>> कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेल्या दुफळीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव पुढील कार्यवाहीसाठी आज दुपारी गोव्यात दाखल झाले आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.