Gokul Election Result | महाडिक गटाने खातं उघडलं, सूनबाई शौमिका महाडिक विजयी
महिला प्रवर्गात सत्ताधारी गटाच्या शौमिका अमल महाडिक आणि विरोधी गटाच्या अंजना केदारी रेडेकर यांच्यात चुरस होती (Gokul Election Result Kolhapur Shoumika Mahadik)

कोल्हापूर : बहुप्रतीक्षित गोकुळ दूधसंघ निवडणुकीची मतमोजणी होत असून निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध (Gokul Dudh Sangh Result) संघावर कुणाची सत्ता येणार? हे दिवसअखेर स्पष्ट होईल. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या पॅनलची घोडदौड सुरु झाल्याने महाडिक घटाची धाकधूक वाढली होती. अशातच दिलासादायक बाब म्हणजे, भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आणि महिला प्रवर्गात सत्ताधारी गटाच्या उमेदवार शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) विजयी झाल्या आहेत. (Gokul Election 2021 Result Kolhapur Dudh Sangh BJP Shoumika Mahadik Result)
पहिल्याच निवडणुकीत शौमिका महाडिक विजयी
सर्वसाधारण महिलांमध्ये सतेज पाटील गटाच्या अंजना रेडेकर विजयी झाल्या, तर महाडिक गटाकडून शौमिका महाडिक 43 मतांनी विजयी झाल्या. महाडिक कुटुंबियातील उमेदवार विजयी झाल्याने जल्लोष केला जात आहे. शौमिका यांना पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली होती. महादेवराव महाडिक आघाडीने खातं उघडल्यानंतर विरोधी गटाकडून फेर मतमोजणीची मागणी केली जात आहे.
गोकुळ निवडणुकीसाठी रविवारी मतदान
गोकुळसाठी रविवारी चुरशीने 99.78 टक्के इतकं झालं आहे. गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरचे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) आणि माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik), माजी खासदार-भाजप नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे गट पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीतील पहिला कल विरोधकांच्या बाजूने लागला आणि महाडिक घटाची धाकधूक वाढली होती.
तिसऱ्या फेरीअखेर विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते. महिला प्रवर्गात सत्ताधारी गटाच्या शौमिका अमल महाडिक आणि विरोधी गटाच्या अंजना केदारी रेडेकर यांच्यात चुरस होती. सुरुवातीच्या कलानुसार अंजना रेडेकर आघाडीवर होत्या, तर शौमिका महाडिक मागे पडल्या होत्या. तर विरोधी आघाडीच्या सुष्मिता राजेश पाटील पुढे आणि सत्ताधारी गटाच्या अनुराधा बाबासाहेब पाटील पिछाडीवर आहेत. मात्र अखेर शौमिका महाडिक विजयी झाल्या
आजवर सत्ताधारी राजर्षी शाहू पॅनलने दूध उत्पादक केंद्री कारभार करत #गोकुळ हा देशातील एक अग्रगण्य सहकारी ब्रँड बनवला आहे. अशा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर गौरविलेल्या सत्ताधारी पॅनेलने मला यंदाच्या निवडणुकीत संधी दिली, त्याबद्दल निवड समिती व सर्व ज्येष्ठ नेत्यांची मी आभारी आहे. pic.twitter.com/SgmBkLixdF
— Shoumika Mahadik. (@shoumikamahadik) April 20, 2021
(Gokul Election Result Kolhapur Shoumika Mahadik)
कोण आहेत शौमिका महाडिक?
शौमिका महाडिक या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा असून सध्या झेडपी सदस्य आहेत. त्या भाजपच्या कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्षपदी आहेत. शौमिका महाडिक यांचे पती अमल महाडिक हे भाजपचे माजी आमदार असून दीर माजी खासदार धनंजय महाडिक हे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. शौमिका महाडिक या माजी आमदार महादेव महाडिक यांच्या स्नुषा.
पहिला निकाल बंटी पाटलांच्या बाजूने
दरम्यान, सतेज पाटील गटाचे उमेदवार आणि माजी आमदार सुजित मिणचेकर 346 मतांनी विजयी झाले. तर अमर पाटील 436 मतांनी जिंकून आले. सुरुवातीला राखीव प्रवर्गातील दोन फेऱ्यांची मतमोजणी झाली असून, अजून दोन फेऱ्या होणार आहेत. राखीव गटातील मतमोजणी झाल्यानंतर सर्वसाधारण गटातील मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीलाच राखीव प्रवर्गातील विरोधी आघाडीतील पाचही उमेदवारांनी आघाडी घेतली होती.
सतेज पाटील यांच्या राजश्री शाहू शेतकरी आघाडीचे तीन उमेदवार विजयी
सुजीत मिणचेकर – 346 मतांनी विजयी अमर पाटील – 436 मतांनी विजयी बयाजी शेळके – 239 मतांनी विजयी
संबंधित बातम्या :
Gokul Dudh Sangh Election Result Live | बंटी पाटलांचे तीन शिलेदार विजयी, महाडिक गटाची धाकधूक वाढली
“मीच जाणती, बाकी सारे इमॅच्युअर, असा दावा नाही” भाजप पदाधिकाऱ्याचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा
(Gokul Election 2021 Result Kolhapur Dudh Sangh BJP Shoumika Mahadik Result)