खडसेंच्या पक्षांतरावेळीच प्रफुल पटेलांच्या निकटवर्तीयाचा राष्ट्रवादीला रामराम

माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय असलेले गोंदियातील राष्ट्रवादीचे युवा नेते अशोक उर्फ गप्पू गुप्ता यांनी पक्षाचा राजीनामा दिला.

खडसेंच्या पक्षांतरावेळीच प्रफुल पटेलांच्या निकटवर्तीयाचा राष्ट्रवादीला रामराम
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 6:40 PM

गोंदिया : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची धामधूम सुरु असतानाच राष्ट्रवादीला एक धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्या निकटवर्तीय नेत्याने राष्ट्रवादीला रामराम ठोकला. गोंदियातील राष्ट्रवादीचे युवा नेते अशोक उर्फ गप्पू गुप्ता यांनी पक्षाचा राजीनामा दिला. (Gondia NCP Leader Ashok Gopu Gupta left party to join Congress)

विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पाटोले, प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत गुप्ता यांनी मुंबईत काँग्रेसचा झेंडा हाती धरला. गप्पू गुप्ता यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे गोंदियात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. गप्पू गुप्ता हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय समजले जायचे.

गप्पू गुप्ता हे गेल्या विधानसभा निवडनुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढले होते, मात्र त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. तर नगरपरिषद अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरले असतानाही त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली.

नाना पाटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढण्यासाठी पक्षप्रवेश केल्याचे सांगितले जाते. गप्पू गुप्ता यांच्यासोबत मोठा युवावर्ग असल्याने गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष समविचारधारेचे आहेत. आईच्या घरुन मी मावशीच्या घरात आले आहे, अशी प्रतिक्रिया गप्पू गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

गप्पू गुप्ता मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश करुन गोंदियात परतले. त्यानंतर काँग्रेस पक्षातर्फे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. आगामी निवडणुकीत त्यांना किती यश मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

संबंधित बातम्या :

एकनाथ खडसेंचा भाजपला रामराम, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

“मी मुंडेंच्या अपघाताच्या चौकशीची मागणी केली, मला पक्ष सोडायला लावला, आता खडसेंनाही तेच”

(Gondia NCP Leader Ashok Gopu Gupta left party to join Congress)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.