‘संभाजीनगर करु म्हणणाऱ्यांना आता निजामशाहीचीच पालखी वाहण्यात जास्त आनंद मिळतोय’, पडळकरांचा घणाघात
ऐन हिंदू सणाच्या दिवशी महाराष्ट्राची आणि हिंदुत्वाची शान असलेला भागवा ध्वज लावण्यावरुन जर उस्मानाबादमध्ये पोवलिसांवर दगडफेक होते. त्यावेळी एरवी उस्मानाबादला धाराशिव करु म्हणणाऱ्यांच्या हाताला काय लकवा मारतो काय? असा सावलही पडळकर यांनी केलाय.
सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संभाजीनगरच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. औरंगाबादला संभाजीनगर करु म्हणणाऱ्यांना आता निजामशाहीचीच पालखी वाहण्यातच जास्त आनंद मिळतोय असं दिसतंय, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी केलीय. ते आज सांगलीत बोलत होते. (Gopichand Padalkar criticizes Shiv Sena and MP Sanjay Raut on Hindutva issue)
जनाब संजय राऊत, महाराष्ट्रात औरंगजेबाची स्तुती करणारी पोस्ट लिहिली जाते आणि त्यावरुन उस्मानाबादेत दंगे होतात. तुमचा महाराष्ट्रातील कमकुवतपणा आणि लाचारी लपवण्यासाठीच तुम्ही भाजपला हिंदुत्व शिकवणारे मोठे मोठे लेख लिहिता. जनाब राऊत, तुम्हाला कदाचित काकांच्या मांडीवरुन उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान आणि औरंगजेबाच्या अवलादींचा तांडव दिसत नसेल. ऐन हिंदू सणाच्या दिवशी महाराष्ट्राची आणि हिंदुत्वाची शान असलेला भागवा ध्वज लावण्यावरुन जर उस्मानाबादमध्ये पोवलिसांवर दगडफेक होते. त्यावेळी एरवी उस्मानाबादला धाराशिव करु म्हणणाऱ्यांच्या हाताला काय लकवा मारतो काय? असा सावलही पडळकर यांनी केलाय.
‘सत्ता टिकवण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का?’
तुमच्या आघाडी सरकारमधील मंत्री स्वातंत्र्यवीर सावकरकांवर उलटसुटल लिहितात. त्यावेळी सत्ता टिकवण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का? औरंगाबादेत गरोदर महिलेवर अत्याचार होतो. तरी त्यावर आपल्याला एक ओळ खरडावी वाटत नाही. औरंगाबादला संभाजीनगर करु म्हणणाऱ्यांना आता निजामशाहीचीच पालखी वाहण्यात जास्त आनंद मिळतोय, असं दिसतंय, असा हल्लाबोल पडळकर यांनी संजय राऊतांवर केलाय.
‘सामना’तून ओबीसी आणि भाजपवर टीका
यापूर्वी संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ‘मुसलमान या देशाचे नागरिक आहेत व त्यांनी या देशाचे संविधान पाळूनच आपला मार्ग बनवला पाहिजे असे सांगण्याची हिंमत ओवेसींमध्ये ज्या दिवशी येईल त्या दिवशी ओवेसी यांना राष्ट्रीय नेते म्हणून प्रतिष्ठा मिळेल, नाहीतर भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाईल’, अशी टीका करण्यात आली होती.
‘जनाब राऊत MIM की मुहब्बत कौन है?’
राऊतांच्या या टीकेला पडळकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. उद्धव सेनेचे 56 आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावरच निवडून आले आहेत. हे कदाचित जनाब संजय राऊत विसरले असतील. त्यांनी ओवीसींची तुलना भाजपाचे अंगवस्त्र म्हणून केलेली आहे. पण याच ओवीसीला आलिंगन घालून मालेगावच्या सत्तेच्या इदीचा नजराणा तुम्ही पेश केला. एवढंच नाहीतर अमरावती मनपातसुद्धा सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली होती. आता ‘जनाब राऊत MIM की मुहब्बत कौन है?’ हे महाराष्ट्राला सांगायची आवश्यकता नाही.
योगींनी मुख्यमंत्री बनू नये म्हणून शपथा घेणाऱ्यांना योगीजी बघून घेतील. ते सक्षम आहेत. पण महाराष्ट्रातील हिंदूना शिव्या देणारा शर्जील उस्मानीसारख्या व्यक्तीवर तुम्हाला कारवाई करण्याची हिंमत नाही. अशा भेकड प्रवृत्तींनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नाही, असं पडळकर म्हणाले होते.
इतर बातम्या :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सर्व मेळावे, दौरे तात्पुरते स्थगित! नेमकं कारण काय?
नागपुरात भाजपकडून अनेक महिला नगरसेविकांचं तिकीट कापण्याची शक्यता, नेमकं कारण काय?
Gopichand Padalkar criticizes Shiv Sena and MP Sanjay Raut on Hindutva issue