उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये : गोपीचंद पडळकर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला 'कोरोना' आहेत, अशी घणाघाती टीकाही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये : गोपीचंद पडळकर
Follow us
| Updated on: Jun 24, 2020 | 12:26 PM

पंढरपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये, अशी मागणी भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. शेतकरी कुटुंबाला महापूजेचा मान देण्याचे पडळकर यांनी सुचवले. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मान दरवर्षी मुख्यमंत्र्यांना सपत्नीक देण्याची परंपरा आहे. (Gopichand Padalkar emphasis not allowing CM Uddhav Thackeray to perform Pandharpur Ashadhi Ekadashi Mahapooja)

“सध्या कोरोना संसर्ग असल्याने पंढरपुरात बाहेरील व्यक्ती, महाराज मंडळींना प्रवेश नसेल, तर यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये” असं गोपीचंद पडळकर पत्रकार परिषदेत म्हणाले. सामान्य शेतकरी, वारकरी कुटुंबाला विठ्ठल-रखुमाईच्या महापूजेचा मान द्यावा, असा आग्रह पडळकर यांनी धरला.

हेही वाचा : विधानसभेला पडल्याने पंकजाताईंना विधानपरिषद तिकीट नाकारलं, मग पडळकरांना कसं दिलं? खडसेंचा सवाल

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला ‘कोरोना’ आहेत, अशी घणाघाती टीका पडळकर यांनी केली.

धनगर समाजाला फडणवीस सरकारने तरतूद केलेले एक हजार कोटी सुद्धा महाविकास आघाडी सरकारने दिले नाहीत. शरद पवार नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, पण अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. सगळा फार्स सुरु आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

कोण आहेत गोपीचंद पडळकर?

धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात. आतापर्यंत धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. (Gopichand Padalkar on Uddhav Thackeray)

धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकत भाजपमध्ये घरवापसी केली होती. ‘वंचित’कडून लढताना लोकसभेत पराभव झाला. त्यानंतर विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढली होती, मात्र बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकाने पराभव झाला होता. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. परंतु भाजपने त्यांना  विधानपरिषदेला संधी दिली.

(Gopichand Padalkar emphasis not allowing CM Uddhav Thackeray to perform Pandharpur Ashadhi Ekadashi Mahapooja)

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.