आंबेडकर आणि ओवेसींच्या भेटीसाठी गोपीचंद पडळकर नागपुरात!
पुणे : धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या भेटीसाठी नागपुरात दाखल झाले आहेत. गोपीचंद पडळकर हे सांगली लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. गोपीचंद पडळकर आज दुपारी अॅड. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेणार आहेत. परवा म्हणजे तीन एप्रिल रोजी गोपीचंद […]
पुणे : धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या भेटीसाठी नागपुरात दाखल झाले आहेत. गोपीचंद पडळकर हे सांगली लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत.
गोपीचंद पडळकर आज दुपारी अॅड. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेणार आहेत. परवा म्हणजे तीन एप्रिल रोजी गोपीचंद पडळकर हे सांगलीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधीच गोपीचंद पडळकर प्रकाश आंबेडकर आणि ओवेसींची भेट घेत असल्याने चर्चांनाही उधाण आलं आहे. गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीकडून सांगलीतून लढणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, सांगलीतला उमेदवार जाहीर झाला असून, बदणार नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली होती.
कोण आहेत गोपीचंद पडळकर?
धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात. आतापर्यंत धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. गोपीचंद पडळकर भाजपमधील धनगर समाजाचे नेते म्हणून महत्त्वाच्या पदावर होते. मात्र काही गोष्टींवरुन बिनसल्याने पडळकरांनी पक्षाला राम राम करत राजीनामा दिला आहे.
सांगलीत लोकसभेची सद्यस्थिती काय?
सांगली लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले संजयकाका पाटील हे विद्यमान खासदार आहेत. त्यांनाच भाजपने पुन्हा एकदा सांगलीतून लोकसभेचं तिकीट दिलं आहे. त्यात आघाडीकून स्वाभिमानीसाठी सोडलेल्या सांगली लोकसभेच्या जागेवरुन स्वाभिमानीने दिवंगत वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना रणांगणात उतरवले आहे. त्यामुळे सांगलीची लढत तुल्यबल होणार आहे. त्यात गोपीचंद पडळकर सांगलीतून लढण्यास उतरले, तर मग लढत अत्यंत चुरशीची होईल, हे निश्चित.