राष्ट्रवादी-शिवसेना नेत्यांची बंगालच्या निवडणुकीवर बोलण्याची उंची नाही, त्यांना दुसऱ्याच्या लग्नात नाचण्याची सवय : पडळकर

पडळकर यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर 'टीव्ही 9 मराठी'सोबत बातचित केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला (Gopichand Padalkar slams NCP and ShivSena).

राष्ट्रवादी-शिवसेना नेत्यांची बंगालच्या निवडणुकीवर बोलण्याची उंची नाही, त्यांना दुसऱ्याच्या लग्नात नाचण्याची सवय : पडळकर
गोपीचंद पडळकर, आमदार भाजप
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 3:42 PM

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बाहेरच्या राज्यांच्या राजकीय घडामोडींवर बोलण्याइतपत त्यांची उंची नाही. मुळात प्रचाराला जाण्याची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब आजारी असल्यामुळे प्रचाराला जावू शकले नाहीत. शिवसेनेचे नेतेही तिथे उमेदवार उभे करणार, असं म्हणाले होते. पण ते उमेदवार उभे करु शकले नाहीत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्याच्या लग्नामध्ये नाचण्याची आधीपासून सवय आहे”, असा घणाघात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला. पडळकर यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला (Gopichand Padalkar slams NCP and ShivSena).

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर भाजपला टोला लगावला आहे. भाजपने जेवढी हवा केली तेवढं त्यांना यश आलं नाही, अशा स्वरुपाची प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली. याच प्रतिक्रियेबाबत पडळकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी राष्ट्रावादी काँग्रेस आणि शिवसेनेवर सडकून टीका केली (Gopichand Padalkar slams NCP and ShivSena).

‘स्वत:चं बघा, भाजपची चिंता करण्याची आवश्यकता नाही’

“राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:चं बघावं. त्यांना भाजपची चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुमचा पक्ष पुढे राहणार का? पुढे ते कोणत्या पक्षात विलीन होणार का? तुमच्या पक्षाचा अजेंडा काय? तुम्ही काय काम करणार आहात? यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. इतक्या लांब पश्चिम बंगालपर्यंत जाण्याची त्यांची कुवत नाही. त्यांनी भाजपचा विचार करु नये. भाजपचे नेते सक्षम आहेत”, अशा शब्दात पडळकर यांनी सुनावलं.

‘भाजपला बंगालमध्ये पहिल्यांदा एवढ्या जागांवर यश’

“हिंदी भाषिक प्रदेशात भाजपचा आधीपासून प्रभाव राहिलेला आहे. भाजपला पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच एवढ्या चांगल्या जागांनी यश मिळाले आहे. कार्यकर्त्यांचा मनामध्ये उत्साह वाढवणं, त्यांचं मनोबल वाढवणं हे पक्षश्रेष्ठींचं काम असतं. आता पहिल्यांदाच बंगालमध्ये भाजपला एवढ्या जागा मिळत आहेत. आम्ही निश्चितच काही जागांवर कमी पडलो. त्यामध्ये काही वाईट वाटण्यासारखं नाही. पण काँग्रेससारखा प्रश्न नेस्तानाबूत झाला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीत त्यांची काय परिस्थितीत झालीय, त्याच्यावरही विचार व्हायला हवा. ही काँग्रेसमुक्त भारताकडे वाटचाल आहे का? याबाबत विचार व्हायला हवा”, असं पडळकर म्हणाले.

हेही वाचा : भाजपनं एखाद्या विजयामुळं हुरळून जाऊ नये, सतेज पाटलांचं टीकास्त्र

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.