OBC Empirical Data : आता संघर्ष अटळच, ओबीसींच्या इम्पिरिकल डेटावरून गोपीचंद पडळकर यांचा इशारा

OBC Empirical Data : आता तो मागासवर्ग आयोग बरखास्त करून नवीन आयोग नेमला आहे. सध्याच्या बांठिया आयोगाने 8 जून पर्यंत डेटा गोळा करून सरकारकडे सुपूर्द करणे आवश्यक होते. परंतु बांठिया आयोगाचा मनमानी कारभार नेमका कोण्याच्या इशाऱ्यावर सुरू आहे?

OBC Empirical Data : आता संघर्ष अटळच, ओबीसींच्या इम्पिरिकल डेटावरून गोपीचंद पडळकर यांचा इशारा
आता संघर्ष अटळच, ओबीसींच्या इम्पिरिकल डेटावरून गोपीचंद पडळकर यांचा इशाराImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 1:56 PM

मुंबई: आडनावावरुन ओबीसींची गणना (OBC Reservation)  करून इम्पिरिकल डेटा तयार केला जात आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आघाडी सरकारवर (mahavikas aghadi) टीका केली. आघाडीतील मंत्र्यांनीही फडणवीसांच्या म्हणण्यात तथ्य असल्याचं सांगितलं. त्यावरून आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर अधिक आक्रमक झाले आहेत. हे सरकार ओबीसींना न्याय देऊ शकणार नाही. या सरकारमध्ये ओबीसींना आरक्षण मिळणं कठिण आहे. त्यामुळे आता संघर्ष अटळ आहे, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ व्हायरल करून ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका मांडत आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. गेल्या अडीच वर्षापासून उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीचे सरकार ओबीसींच्या राजकीय हक्कांना पायदळी तुडवण्याची एकही संधी सोडत नाहीये हे आता वारंवार सिद्ध झालं आहे, असं पडळकर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

सुरूवातीला आपलं अपयश झाकण्यासाठी जणगणनेचा डेटा की इम्पिरिकल डेटा असा केंद्र सरकार विरूद्ध राज्य सरकार वाद निर्माण केला. त्यात दीड वर्ष घालवले. वेळेवर आयोगाचं गठन न करणं, केले तरी त्याला हेतूपूरस्पर निधी देण्यास टाळाटाळ करणे, या सर्व भानगडीमुळे ठाकरे सरकार सुप्रीम कोर्टात तोंडावर आपटलं. मध्यप्रदेश सरकारने ट्रीपल टेस्ट करून, इम्पिरिकल डेटा कोर्टापुढे मांडून आपला ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा केला. परंतु महाराष्ट्रातील पवारांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सरकारला कोर्टात असा डेटा देता आला नाही, असं पडळकर म्हणाले.

ग्रामपंचायतीच्या ऑफिसमधूनच काम सुरू

आता तो मागासवर्ग आयोग बरखास्त करून नवीन आयोग नेमला आहे. सध्याच्या बांठिया आयोगाने 8 जून पर्यंत डेटा गोळा करून सरकारकडे सुपूर्द करणे आवश्यक होते. परंतु बांठिया आयोगाचा मनमानी कारभार नेमका कोण्याच्या इशाऱ्यावर सुरू आहे? ते स्थानिक स्वराज्य संस्थेला डेटा गोळा करताना कुठलीही शास्त्रशुद्ध पद्धत न वापरता, प्रत्यक्ष लोकांना न भेटता गावातील लोकांच्या आडनावावरून व ग्रामपंचायतींच्या ऑफीसमधूनच थातूरमातूर काम करत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

ओबीसींना फसवण्याचं काम सुरू

जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महानगर पालीकेने तर ओबीसीच्या आरक्षणाचा पोरखेळ केला आहे. आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आडनावांच्या आधारे ते ओबीसी आहेत की नाही हे ठरविण्याचे निर्देश दिले आहेत. हे सरळ सरळ दिवसाढवळ्या ओबीसी समाजाला फसवण्याचं काम सुरू आहे. या सर्व परिस्थितीवरून आपले सरकार प्रस्थापितांच्या रिमोट कंट्रोलवर चालतंय हे सिद्ध झालंय. त्यामुळे आता परत एकदा ओबीसी आरक्षण टिकविण्याचा फसवा प्रयत्न सुप्रीम कोर्ट फेटळणार आहे आणि परत महाराष्ट्राला नामुष्की सहन करावी लागणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.