Video | महाविकास आघाडीला फक्त वसुलीत रस; बहुजनांच्या मुलांकडे दुर्लक्ष, म्हाडाच्या परीक्षेवरून पडळकरांचा टोला
म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांवर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा हिशोब न चुकता एक्सेल शीटमध्ये घेतात. मात्र त्यांना बहुजन मुलांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडाच्या परीक्षेकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याची टीका पडळकर यांनी केली आहे.
मुंबई : म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे. काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडाच्या व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा जानेवारीमध्ये होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान यावरून आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांवर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा हिशोब न चुकता एक्सेल शीटमध्ये घेतात. मात्र त्यांना बहुजन मुलांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडाच्या परीक्षेकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
काय म्हणाले पडळकर?
जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा हिशोब न चुकता एक्सेल शीटमध्ये घेतात. मात्र त्यांना बहुजन पोरांच्या भविष्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. म्हाडाच्या नोकरभरती परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचे ते स्व:चा गेल्या आठवड्यापासून सांगत आहेत. परीक्षेत घोटाळा झाल्याची त्यांना पूर्वकल्पना होती, गृहखाते देखील राष्ट्रवादीकडे आहे, मग असे असतानाही परीक्षेच्या अवघ्या काही तास आधी परीक्षा रद्द करण्याची त्यांच्यावर वेळ का आली? असा सवाल पडळकरांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडी सरकारला फक्त वसुली करण्यात रस आहे. त्यांना बहुजनांच्या पोरांच्या भविष्याची काळजी नाही. एक-एक पैसा गोळा करून विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत. आजच्या या निर्णयामुळे त्यांचा भ्रमनिरास झाल्याची टीका यावेळी पडळकर यांनी केली.
पुण्यातून तिघांना अटक
म्हाडा भरती परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी (MHADA Exam) पुण्यात तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलिसांची कारवाई सुरु असून मोठे मासे गळाला लागल्याची माहिती आहे. आरोग्य भरतीनंतर म्हाडा परीक्षेचा पेपरही फुटणार होता, असा दावा केला जात आहे. सायबर पोलिसांची सतर्कता आणि एमपीएससी समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश आलं आहे. रविवारी तिन्ही आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली.
संबंधित बातम्या
विनायक राऊतांमुळे महाराष्ट्राची मान खाली गेली, नारायण राणेंवरील टीकेला निलेश राणेंचे प्रत्युत्तर
निवडणुकांमध्ये 99 टक्के आघाडी होणारच, भाजपला पराभूत करण्यासाठी दोन पावलं मागे येऊ: जितेंद्र आव्हाड