पवारांमुळे आरक्षण मिळालं नाही हे पडळकरांचं म्हणणं योग्यच : चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील म्हणाले, "गोपीचंद पडळकरांनी काही भूमिका मांडली आहे. पवार सगळ्यांचे गॅाडफादर आहेत. तसं म्हटल्यानंतर त्यांच्यावर दोष जातो.

पवारांमुळे आरक्षण मिळालं नाही हे पडळकरांचं म्हणणं योग्यच : चंद्रकांत पाटील
शरद पवार आणि चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 12:44 PM

योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांच्यामुळेच आरक्षण (Reservation) मिळालं नाही हे आमदार गोपीचंद पडाळकर (Gopichand Padalkar)  यांचं म्हणणं योग्यच आहे. शरद पवार हे सगळ्याचे गॉडफादर आहेत. ठाकरे सरकारचे (Thackeray Sarkar) ते मार्गदर्शक आहेत. मराठा आरक्षणप्रकरणात (Maratha Reservation) सुप्रीम कोर्टाचा निकाल वाचल्यावर किती दिरंगाई झाली ते समजतं, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) म्हणाले. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात अनाथ मुलांना साहित्य वाटप करण्यात आलं. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “गोपीचंद पडळकरांनी काही भूमिका मांडली आहे. पवार सगळ्यांचे गॅाडफादर आहेत. तसं म्हटल्यानंतर त्यांच्यावर दोष जातो. माझी डिबेट करायची तयारी आहे. मी निकाल वाचला. त्यात पावला-पावलावर जाणवतंय की चुका आहेत. ॲार्डिनन्सचा कायदा केला नाही”.

भाजपचा संघर्ष संपणार नाही

3 जून 2014 रोजी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना गोपीनाथ मुंडेंचे निधन झाले. आज 7 वर्ष झाली. दुपारी डाक विभाग त्यांच्यावर एक एन्व्हलप करत आहे. सतत संघर्ष हे त्यांचे ध्येय होते. कार्यालयातली पार्टी त्यांनी रस्त्यावर आणली. भाजपचा संघर्ष कधीच संपणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

शरद पवार-फडणवीस भेट

भेटीगाठी अनेक कारणांनी सुरु आहेत. शरद पवार आजारी आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भेट करुन विचारपूस केली. भाजप खासदार रक्षा खडसेंचीही भेट त्यांनी घेतली. दुश्मन जरी असला तरी भेट घेणं ही संस्कृती आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

संघर्ष ही काही नवी गोष्ट नाही. जर संवाद नसेल तर अडचण असते. पण इथे ते आहे त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असंही त्यांनी नूद केलं.

गोपीचंद पडळकर आरक्षणाबाबत काय म्हणाले होते?

“शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वात जनमत नसताना घातपाताने बनलेले आघाडी सरकार बहुजनांच्या हक्काच्या आरक्षणाच्या मुळावर उठलेलं आहे. आधी मराठा समाजाचं, आता ओबीसींचं राजकीय आरक्षण आणि बहुजनांचं पदोन्नतीतील आरक्षण संपवण्याच्या ‘कटा’चा ‘सुत्रधार’ कोण? पवार घराण्याची चाकरी करणारा कुठला सरकारी वकील आरक्षण विरोधी ‘कट-कुंभा’चा ‘कोणी’ कोण ?”

संबंधित बातम्या 

पवारांनी येडं पेरलं अन् खुळं उगवलं, गोपीचंद पडळकरांचा तुफान हल्ला

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.