अर्णव गोस्वामींऐवजी नाईक कुटुंबाची राज्यपालांनी काळजी करावी; नवाब मलिक यांचा टोला
राज्यपालांनी गंभीर गुन्ह्यातील अर्णव गोस्वामींची काळजी करण्याऐवजी नाईक यांच्या कुटुंबीयांची काळजी करावी, असा टोला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी लगावला आहे. (Governor should be more concerned about victim than Arnab says nawab malik)
मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात अटकेत असलेले पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी चांगलेच अडचणीत सापडले असून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राज्यपालांनी गंभीर गुन्ह्यातील अर्णव गोस्वामींची काळजी करण्याऐवजी नाईक यांच्या कुटुंबीयांची काळजी करावी, असा टोला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी लगावला आहे. (Governor should be more concerned about victim than Arnab says nawab malik)
‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना नवाब मलिक यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे. राज्यपाल कोणाची चिंता करत आहेत. अर्णव गोस्वामी यांना गंभीर गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली आहे. आरोपींना नियमानुसारच सर्व गोष्टी दिल्या जातात. त्यांची विशेष कैदी म्हणून राज्यपालांनी काळजी करू नये. उलट त्यांनी अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांची काळजी करावी, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.
मलिक यांच्या आधी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही राज्यपालांवर टीका केली होती. राज्यपालांनी गोस्वामी यांची चिंता करू नये. सरकारी नियमांनुसार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात आहे, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते. राज्यपाल लहानसहान गोष्टींमध्ये लक्ष घालत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, असा टोलाही त्यांनी लगावला होता. गोस्वामी यांची चिंता करू नये. सरकारी नियमांनुसार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात आहे, असं सांगतानाच राज्यपाल लहानसहान गोष्टींमध्ये लक्ष घालत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, असा टोलाही त्यांनी लगावला होता.
अर्णव यांना अटक झाल्यापासून भाजप नेते त्यांना जामीन देण्याची सातत्याने मागणी करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेटही घेतली होती. यानंतर आज लगेचच राज्यपालांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दूरध्वनी केला.
त्यावेळी अर्णव गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत राज्यपालांनी चिंता व्यक्त केली. अर्णव गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटून दिले जावे, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, अर्णव गोस्वामी यांच्या घरात ज्याप्रकारे पोलिसांचा फौजफाटा शिरला आणि त्यांना अटक करण्यात आली, याविषयीही राज्यपालांनी गृहमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
NCP minister Nawab Malik said the way Governor Mr Khoshyari concerned abt Arnab Goswami security, he should also worry of Naik family who lost two family members. Governor should be more concerned abt victim than Arnab who is accused in serious crime like abetment of suicide
— Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) November 9, 2020
संबंधित बातम्या:
राज्यपालांनी अर्णव गोस्वामींची चिंता करु नये, सरकार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतेय: भुजबळ
अर्णव गोस्वामींना अंतरिम जामीन नाहीच, कोर्टाने अर्ज फेटाळला
अर्णव गोस्वामींच्या जीवाला धोका असल्यामुळे राज्यपालांना गृहमंत्र्यांशी बोलावे लागले
(Governor should be more concerned about victim than Arnab says nawab malik)