औरंगाबाद: राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी योग गुरु रामदेवबाबांना टोला लगावला आहे. रामदेव बाबा जेवढ्या गाई नाहीत तेवढं तूप विकत आहेत. जेवढ्या मधमाशा नाहीत तेवढं मध विकत आहेत. आपलं बुवा रामदेवबाबांसारखं नाही. जेवढ्या गाई आहेत तेवढंच तूप निघतं आणि तेवढंच विकतो, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला. (Guardian minister vijay wadettiwar attacks ramdev baba)
औरंगाबादमध्ये ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी हा टोला लगावला. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपला धारेवर धरलं. इंपेरिकल डाटासाठी भाजप सरकारच्या काळातही पत्र पाठवण्यात आले होते. आमचं सरकार आल्यानंतरही आम्ही केंद्र सरकारला पत्र पाठवले होते. पण केंद्राने इंपेरिकल डाटा दिला नाही. ओबीसींच्या हक्काच्या 40 हजार राजकीय जागा आमच्या हक्काच्या आहेत. त्या जागा आम्ही कुणालाही देऊ देणार नाही, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.
यावेळी त्यांनी ओबीसींना एकत्र येण्याची हाकही दिली. खुर्चीचे चारही पाय हलवण्याची ताकद ओबीसी समाजात निर्माण झाली पाहिजे. तीन पक्षाच्या सरकारमध्ये एकमत व्हावं लागतं. आमचे मुख्यमंत्री समजदार आहेत. ओबीसी हॉस्टेलला निधी मिळत नव्हता, मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना बोलवून ओबीसी हॉस्टेलला निधी उपलब्ध करून दिला. ओबीसींना 2 हजार कोटी रुपये स्कॉलरशिप मिळते. मात्र फक्त 100 कोटी रुपये केंद्र सरकार देतं, असं त्यांनी सांगितलं.
तुझ्या मनात आग, माझ्या मनात आग, वेळ नको घालू राजा बंदूक धरायची वेळ येईल, मग नक्षलवाद्यांकडे जावे लागेल, असं विधानही त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना केलं. (Guardian minister vijay wadettiwar attacks ramdev baba)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 7 August 2021 https://t.co/3uK8CdWvmW #Mahafast #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 7, 2021
संबंधित बातम्या:
तेजस ठाकरे माझ्या डोक्याबाहेरचा विषय, जीवसृष्टी सोडून राजकारणात येईल असं वाटत नाही: भुजबळ
भाजप नेत्यांचे दिल्लीदौरे नेमके कशासाठी? देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट, वाचा सविस्तर
(Guardian minister vijay wadettiwar attacks ramdev baba)