गुजरातमध्ये डिसेंबरमध्ये फटाके फुटणार; 1 नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या तारखा घोषित होणार?

निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयोगांने गुजरातमध्ये साफसफाई केली आहे. निवडणूक आयोगाने गुजरातमधील विविध ग्रेड आणि सेवांमधील 900 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

गुजरातमध्ये डिसेंबरमध्ये फटाके फुटणार; 1 नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या तारखा घोषित होणार?
गुजरातमध्ये डिसेंबरमध्ये फटाके फुटणार; 1 नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या तारखा घोषित होणार? Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 29, 2022 | 11:02 AM

नवी दिल्ली: गुजरात विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. हिमाचल प्रदेशसोबतच (himachal pradesh) गुजरातच्या निवडणुका (Gujarat Election) जाहीर होतील असं सांगितलं जात होतं. पण या निवडणुकांची घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे गुजरातमध्ये (Gujarat) निवडणुकीचे फटाके कधी फुटणार? असा सवाल केला जात आहे. निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 1 नोव्हेंबर रोजी निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. गुजरातच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर तात्काळ आचारसंहिता लागू होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. यात 1 व 2 डिसेंबर रोजी पहिला टप्पा आणि 4 किंवा 5 तारखेला दुसरा टप्प्यातील मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबर रोजी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हिमाचल प्रदेशातील निवडणुका घोषित करण्यात आल्या होत्या. पण गुजरातच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या नाही. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली होती. पंतप्रधान काही तरी मोठ्या घोषणा करतील. तसेच उद्घाटनं करतील. त्यासाठी निवडणूक आयोग भाजपला वेळ देत आहे, असा आरोप काँग्रेसने केला होता.

हे सुद्धा वाचा

मीडिया रिपोर्टनुसार येत्या 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दौऱ्यावर जात आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात ते भाग घेणार आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात सर्व राज्यातील पोलीस एकत्र येणार असून त्यांची परेड होणार आहे. या कार्यक्रमाला मोदी हजेरी लावणार आहेत. तसेच जांबुघोडा येथे आदिवासींनाही ते संबोधित करणार आहेत.

त्यानंतर मोदी बासनकांठा पाणी योजनेचं लोकार्पण करण्यात येणार आहे. मोदींच्या या कार्यक्रमानंतरच निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखांची घोषणा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयोगांने गुजरातमध्ये साफसफाई केली आहे. निवडणूक आयोगाने गुजरातमधील विविध ग्रेड आणि सेवांमधील 900 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन आणि सूचनांनुसारच या बदल्या करण्यात आल्या आहेत.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.