मंदिर आणि कथा प्रवचन म्हणजे शोषणाचं घर, आप नेत्याचं वादग्रस्त विधान; भाजपकडून हल्लाबोल
अशा पद्धतीने मोदींबाबत अपशब्द वापरणे म्हणे गुजरातचा गौरव आणि धरतीपुत्राला शिव्या देण्यासारखं आहे. हा प्रत्येक गुजराती व्यक्तीचा अपमान आहे.
अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या विरोधात अपशब्द वापरल्यानंतर वादग्रस्त ठरलेले आम आदमी पार्टीचे (aap) संयोजक गोपाल इटालिया पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. भाजपने (bjp) गोपाल इटालिया यांचा एक कथित व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत ते महिलांना मंदिरात न जाण्याचा आणि कथा न ऐकण्याचा सल्ला देताना दिसत आहे. मंदिर आणि कथा म्हणजे शोषणाचं घर असल्याचं म्हणतानाही ते दिसत आहेत. त्यामुळे इटालिया यांच्या या विधानावरून आम आदमी पार्टी चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता दिसत आहे.
भाजपचे गुजरातचे प्रवक्ते यग्नेश दवे यांनी हा व्हिडीओ जारी करून दावा केला आहे. या व्हिडीओत गोपाल इटालिया बोलताना दिसत आहेत. कथा ऐकण्याने आणि मंदिरात जाण्याने तुम्हाला काहीच मिळणार नाही. ते शोषणाचं घर आहे. तुम्हाला तुमचे अधिकार हवे असतील तर या देशावर राज्य करा. समान हक्क मिळवा. कथांमध्ये नाचण्याऐवजी आणि गाण्या ऐवजी माता आणि भगिनींनो पुस्तक वाचा, असं आवाहन करताना इटालिया दिसत आहे.
હવે જુઓ આ ભાઈ શું કહી રહ્યા છે… આજે તો હદ જ વટાવી. pic.twitter.com/Gs2Z0RYYcc
— Dr.Yagnesh Dave (@yagnesh_dave) October 11, 2022
यापूर्वी इटालिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नौटंकी म्हटलं होतं. त्याशिवाय त्यांनी मोदींबाबत अपशब्दही वापरले होते. या पूर्वी कधी कोणत्या पंतप्रधानांनी अशी नौटंकी केली होती का? असा सवाल त्यांनी केला होता.
त्यानंतर भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिलं होतं. अशा पद्धतीने मोदींबाबत अपशब्द वापरणे म्हणे गुजरातचा गौरव आणि धरतीपुत्राला शिव्या देण्यासारखं आहे. हा प्रत्येक गुजराती व्यक्तीचा अपमान आहे. तसेच आपच्या नेत्याकडून महिलाशक्तीचाही अपमान करण्यात आला आहे, असं त्यांनी सांगितलं.