AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छातीठोक दावा करणारे अरविंद केजरीवाल गुजरातेत कुठे कमी पडले? गुजराती जनतेनं काय नाकारलं?

माझी भविष्यवाणी खरी ठरते, लिहून घ्या.. गुजरातेत आम आदमी पार्टीचाच मुख्यमंत्री होणार.. असे म्हणणारे अरविंद केजरीवाल आणि त्यांची पार्टी गुजरातेत सपशेल आपटली.

छातीठोक दावा करणारे अरविंद केजरीवाल गुजरातेत कुठे कमी पडले? गुजराती जनतेनं काय नाकारलं?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 2:11 PM

अहमदाबादः गुजरातचं चित्र स्पष्ट आहे. 27 वर्षानंतरही भाजपचा मुख्यमंत्री सत्तेवर येणार. मोदींची मॅजिक पुन्हा चालली अन् काँग्रेस नेस्तनाबूत झाली. आम आदमी पार्टीने खातं उघडलं पण मोजक्याच जागांवर समाधान मानावं लागलं. 182 जागांपैकी गुजराती जनतेनं आपच्या पदरात 7 जागांचच दान दिलं. आप इथे तिसऱ्या स्थानी आहे.

लिहून घ्या, गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्री होणार, असा छातीठोकपणे दावा करणारे अरविंद केजरीवाल तोंडावर आपटले. त्यामुळे आत्मपरिक्षण करताना केजरीवाल यांना काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतील.

आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुजरातेत कट्टर प्रामाणिक राजकीय नेत्याची प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न केला. हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी तर नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती छापण्याचीही शिफारस केली.

बिलकिस बानो प्रकरणात दोषींच्या सुटकेवरही त्यांनी चुप्पी साधली. हिंदू मतदार हातून निसटू नये, याची पूर्ण खबरदारी घेतली. पण गुजराती जनतेनं त्यांचे प्रयत्न हाणून पाडले.

गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचे सगळे दावे फोल ठरवले गेले. निवडणूक प्रचारादरम्यान, केजरीवाल आणि आपचे नेते भाजपशी थेट टक्कर असल्याचा दावा करत होते.

काँग्रेस तर या स्पर्धेच्या बाहेर आहे. राज्यात भाजपाचा वारू रोखण्यासाठी फक्त आपच तगडा दावेदार आहे, अशी वक्तव्ये होत होती.

आपने कितीही दावे केले तरी भाजपने ते फार मनावर घेतले नाहीत. प्रत्येक नेत्याने आपच्या दाव्यांकडे दुर्लक्ष केलं.

पंजाबचे पत्ते कामी आले नाहीत….

गुजरातच्या आधी पंजाब विधानसभा निवडणुकीत जुनी पेंशन योजना लागू केली. गुजरातेतही तीच ट्रिक वापरली. जुनी पेंशन योजना लागू करण्याचं आश्वासन दिलं.

या योजनेचा जोरात प्रचार केला. पण गुजरातच्या जनतेवर या आश्वासनाचा परिणाम झाला नाही.

दिल्ली मॉडेलही फेल

अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली मॉडेल दाखवत गुजराती जनतेच्या मनात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. फ्री वीज, पाणी, शिक्षणाचं आश्वासन दिलं.

एकिकडे भाजप गुजरात मॉडेल संपूर्ण देशात आदर्श असल्याचे मिरवते. तिथे केजरीवाल यांचं दिल्ली मॉडेल गुजराती जनतेला पचनी पडलं नाही.

जनतेला भुरळ घालणाऱ्या केजरीवाल यांच्या आश्वासनांना गुजरातने स्पष्ट नकार दिला. गुजरात विधानसभा निवडणुकीत आपला 6, काँग्रेसला 20 तर भाजपाला विक्रमी 153 जागा मिळाल्या. तर अपक्षांना 3 जागा मिळाल्या.

पराभवानंतरही आपचीच चर्चा

गुजरात विधानसभेत सपशेल फेल झाल्यानंतरही केजरीवाल यांच्या आपची चर्चा आहे. कारण आपने 6 जागांवर विजय मिळवलाय.

आपला 12.80 टक्के मते मिळाली. राष्ट्रीय पक्ष बण्यासाठी आपला दोन जागांवर विजय आणि सहा टक्के मतांची गरज होती.

हे यश सहज संपादन केल्याने आम आदमी पार्टी आता राष्ट्रीय पक्ष बनला आहे. आपचे नेते मनीश सिसोदिया यांनी या यशानंतर गुजरातच्या जनतेचे आभार मानले.

या निवडणूक निकालांनतर गुजरात, दिल्ली, पंजाब आणि गोवा या चार राज्यात आपच्या आमदारांनी महत्त्वाचे स्थान मिळवल्याचे दिसून आले. आता हा राष्ट्रीय पक्ष बनलाय.

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.