AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gujrat Election | बंडखोरी इथल्या मातीचा गुण, गुजरातेतल्या या जागेवर काँग्रेसवर तिकिट जिंकलेले भाजपात जातातच! चर्चा तर होणारच!

दरवेळी ज्या पक्षाचा उमेदवार विधानसभा निवडणूक जिंकतो, तो त्याच पक्षाविरोधात बंडखोरी करतो आणि विरोधी पक्षाचा हात धरतो. बहुतांश उमेदवार काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आणि नंतर भाजपच्या वाटेवर गेले.

Gujrat Election | बंडखोरी इथल्या मातीचा गुण, गुजरातेतल्या या जागेवर काँग्रेसवर तिकिट जिंकलेले भाजपात जातातच! चर्चा तर होणारच!
काँग्रेस-भाजपाImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 6:00 PM

अहमदाबादः पुढील काही महिन्यात गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका (Gujrat Assembly Elections ) होणार आहेत. सध्या राज्यात भाजपचे सरकार असले तरीही काँग्रेस (Congress) दुसऱ्या क्रमांकावर आणि आम आदमी पार्टी (Aam Admi Party) तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावताना दिसत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेहमीच चर्चेला येणाऱ्या एका मतदार संघाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. कच्छमधील अबडासा मतदारसंघ. बंडखोरी हा इथल्या जागेचा स्वभाव. दरवेळी ज्या पक्षाचा उमेदवार विधानसभा निवडणूक जिंकतो, तो त्याच पक्षाविरोधात बंडखोरी करतो आणि विरोधी पक्षाचा हात धरतो. बहुतांश उमेदवार काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आणि नंतर भाजपच्या वाटेवर गेले.

अबडासा मतदार संघाचं वैशिष्ट्य काय?

गुजरातमधील अबडासा मतदार संघावर कधी भाजपचा तर कधी काँग्रेसचा विजय झाला. पण कोणत्याही एका पक्षाचा प्रभाव इथे टिकला नाही. 2017 मध्ये येथील विधानसभेत काँग्रेसचे प्रद्युम्न सिंह जडेजा यांनी विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. नंतर पुन्हा त्यांनी 2020 मध्ये पोट निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवली आणि जिंकले. 2017 मध्ये त्यांनी भाजपच्या छबील पटेल यांचा पराभव केला होता. 2012 मध्ये याच जागेवर छबीलदास भाई पटेल यांचा विजय झाला होता. त्यांच्या आधी 2007 मध्ये भाजपचे जयंती भानुशाली यांचा विजय झाला होता.

मतदार संघातील वाईट घटना…

अबडासा विधानसभा मतदार संघावर 2007 मध्ये जिंकलेल्या जयंती भानुशाली यांनी धावत्या ट्रेनमधून आत्महत्या केली होती. तपास संस्थेने भानुशाली यांच्या हत्येच्या आरोपाखाली माजी काँग्रेस आमदार छबील पटेल यांना अटक केली होती. 2017 मध्ये छबील पटेलदेखील भाजपात आले. जयंत भानुशाली आणि छबील पटेल एकमेकांचे राजकीय वैरी होते, असे म्हटले जाते. कच्छमधील या अबडासा विधानसभा मतदार संघात जवळपास 2 लाख 23 हजार 705 मतदार आहेत. यावेळीही भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर होईल, असे म्हटले जात आहे. आता 2002 मधील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेले आमदार प्रद्युम्न जडेजा यांना पुन्हा तिकिट मिळतेय का हे पाहवे लागेल. तसेच भाजप-काँग्रेसच्या खेळात आम आदमी पार्टीच विजयी होते, हेही पाहणे औत्युक्याचे ठरेल.

 आम आदमी पार्टी गुजरातेत पाय रोवणार?

दिल्ली आणि पंजाब विधानसभेत विजयी कामगिरी केल्यानंतर आम आदमी पक्षाने आता गुजरात विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल अत्यंत नियोजनपूर्वक निवडणुकांसाठीची रणनीती आखत आहेत. त्यामुळे भाजपच्या येथील सत्तेला आपचं आव्हान मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

या गोष्टीत धर्म, जात, पात भाषा आणायच्या नाहीत - शरद पवार
या गोष्टीत धर्म, जात, पात भाषा आणायच्या नाहीत - शरद पवार.
27 नागरिकांचे मृत्यू हे सरकारने घेतलेले नरबळी; संजय राऊतांचा घणाघात
27 नागरिकांचे मृत्यू हे सरकारने घेतलेले नरबळी; संजय राऊतांचा घणाघात.
मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल, पाकची तंतरली अन् मध्यरात्री मोठा दावा
मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल, पाकची तंतरली अन् मध्यरात्री मोठा दावा.
पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?
पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?.
पाकिस्तानची मस्ती काय उतरेना..भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे
पाकिस्तानची मस्ती काय उतरेना..भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे.
यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल
यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल.
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर.
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र.
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी.
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.