AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gulabrao Patil : लोक सरपंचाची खुर्ची सोडत नाहीत आम्ही मंत्रीपदे सोडली; जे केलं ते शिवसेना वाचवण्यासाठीच केलं – गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच आम्ही केवळ पक्ष वाचवण्यासाठीच उठाव केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Gulabrao Patil : लोक सरपंचाची खुर्ची सोडत नाहीत आम्ही मंत्रीपदे सोडली; जे केलं ते शिवसेना वाचवण्यासाठीच केलं - गुलाबराव पाटील
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 11:18 AM

जळगाव : गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात जोरदार घडामोडी घडल्याचे पहायला मिळाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून (shiv sena) बंडखोरी केली. त्यानंतर शिवसेनेतील एका मोठ्या आमदारांच्या गटाने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. मोठ्यासंख्येने आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्याने महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले. ठाकरे सरकारकडे बहुमत नव्हते. अखेर विश्वासदर्शक ठारावाच्या आधीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. या सर्व घडामोडींना कोण जबाबदार यावरून आता शिवसेना नेते आणि बंडखोर आमदारांच्या गटाकडून एकोनएकांविरोधात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या सर्व प्रकरणावर बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही उद्धव ठाकरेंना आमदारांच्या नाराजीची वेळोवेळी माहिती दिली, पण त्यांनी कधी समजून घेतलं नाही. शेवटी शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केला, असे गुलाबराव पाटील यांनी म्हलटे आहे.

नेमकं काय म्हटलंय पाटलांनी?

राज्यात सुरू असलेल्या सर्व घडामोडींवर गुलाबराव पाटील यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.  आम्ही उद्धव ठाकरेंना आमदारांच्या नाराजीची वेळोवेळी माहिती दिली, पण त्यांनी कधी समजून घेतलं नाही. शेवटी शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केला. लोक ग्रामपंचायत सरपंचाची खुर्ची सोडत नाहीत. आम्ही मंत्रिपदे सोडून उठाव केला. एक नाही तर 8 मंत्रिपदे सोडली, शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केला आहे. अशा शब्दांत आमदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान विशेष अधिवेशनावेळी देखील त्यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला होता. शदर पवार यांचं एवढं वय झालं आहे तरी देखील ते सातत्याने राज्यात फिरत असतात. जयंत पाटील माझ्या मतदारसंघात येऊन गेले. एकनाथ शिंदे देखील आले. मात्र आम्हालाही वाटतं आमचे नेते मतदाससंघात यावेत मात्र तसं कधीही घडल नसल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हलटे होते.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरेंवर निशाणा

दरम्यान विशेष अधिवेशनात बोलताना गुलाबराव पाटील यांनी चहापेक्षा किटली गरम म्हणत आदित्य ठाकरे यांना देखील डिवचले होते. संवादाचा अभाव होता. कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात नव्हता. मतदारसंघात कधी नेतृत्व फिरकल नाही. तसेच हिंदुत्वासाठी भाजप, शिवसेना एकस येणे गरजेचे होते म्हणून आम्ही बाहेर पडलो असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले होते.

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.