‘बाळ कुणीही जन्माला घालो, ते आमचेच आहे, ही मानसिकता पूर्वीपासून’, गुलाबराव पाटलांचा भाजपला टोला

काहीच नसलं तर श्रेय घ्यायचे असते. बाळ कुणीही जन्माला घालो, ते आमचेच आहे, ही मानसिकता पूर्वीपासून आहे", असा टोला गुलाबराव पाटील यांनी भाजपला लगावला (Gulabrao Patil slams BJP).

'बाळ कुणीही जन्माला घालो, ते आमचेच आहे, ही मानसिकता पूर्वीपासून', गुलाबराव पाटलांचा भाजपला टोला
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 9:02 PM

अहमदनगर : “राज्य सरकार सगळ्या गोष्टी हळूहळू सुरु करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी परिस्थिती बघून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरं भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला. पण काहीच नसलं तर श्रेय घ्यायचं असतं. बाळ कुणीही जन्माला घालो, ते आमचेच आहे, ही मानसिकता पूर्वीपासून आहे”, असा टोला शिवसेना नेते आणि राज्याते पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला लगावला (Gulabrao Patil slams BJP).

गुलाबराव पाटील बुधवारी (18 नोव्हेंबर) साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीला आले होते. मंदिर उघडल्यानंतर शिर्डीत जाऊन साईबाबांचे दर्शन घेणारे ते पहिले कॅबिनेट मंत्री आहेत. दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांना मंदिर उघडण्यावरुन सुरु असेलेल्या श्रेयवादावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाजपवर मिश्किल टीका केली (Gulabrao Patil slams BJP).

राज्य सरकारने राज्यातील सर्व मंदिरं भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार दिवाळी पाडव्यापासून (सोमवार, 16 नोव्हेंबर) राज्यभरातील सर्व मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर भाजपने राज्यभर ढोल-ताशा, घंटानाद करत या निर्णयाचं स्वागत केलं. त्याचबरोबर मंदिर उघडण्यासाठी भाजपने आक्रमक पाऊल उचलल्यानेच सरकारला हा निर्णय घ्यावा लागला, अशा अविर्भावात भाजप नेते बोलत होते. मंदिर उघडल्यानंतर सुरु असलेल्या या श्रेयवादावरुन गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता, खडसेंनी महाविकास आघाडी वाढवावी, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली. “प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यांनी राष्ट्रवादी वाढवावी. मी शिवसेना वाढवणार. मात्र आपण दोघे महाविकास आघाडीचे घटक आहोत हे विसरु नये”, असा चिमटा त्यांनी काढला.

हेही वाचा :

गुपकर आघाडीत काँग्रेसही सहभागी, देशासमोर काँग्रेसला उघडं पाडू : देवेंद्र फडणवीस

तोंड लपवण्यासाठी नितीन राऊतांकडून चुकीचे आकडे, फडणवीसांचा हल्लाबोल

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.