सदावर्तेंना हटवलं! पवारांसोबत झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले, फार मोठी चूक झाली…

St Strike : पत्रकार परिषदेत एसटी कर्मचाऱ्यांना तातडीनं रुजू होण्याचं आवाहन वेगवेगळ्या एसी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी केलं. इतकंच काय तर यावेळी एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही निशाणा साधला. आमची चूक झाली, आता आम्ही वकील बदल आहोत, अशीही माहिती त्यांनी दिली.

सदावर्तेंना हटवलं! पवारांसोबत झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले, फार मोठी चूक झाली...
गुणरत्न सदावर्ते आणि एसटी संपाचा प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 3:02 PM

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याच्या अनुशंगानं एक महत्त्वाची बैठक आज सह्याद्री अतिथी गृहावर पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधींनी शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत चर्चा केली. प्रदीर्घ चर्चेनंतर या बैठकीबाबतची पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत एसटी कर्मचाऱ्यांना तातडीनं रुजू होण्याचं आवाहन वेगवेगळ्या एसी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी केलं. इतकंच काय तर यावेळी एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही निशाणा साधला. आमची चूक झाली, आता आम्ही वकील बदल आहोत, अशीही माहिती त्यांनी दिली. गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. त्यावर अखेर आता तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आता कोण लढणार?

गुणरत्न सदावर्ते यांना हटवून आता त्यांच्याऐवजी दुसरे वकील एसटी कर्मचाऱ्यांची बाजू कोर्टात मांडणार आहेत. वकील सतीश पेंडसे यांच्याकडे आता युक्तिवाद करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते स्वतः डिप्रेशनमध्ये आले असावेत, अशा शब्दांत यावेळी एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी सदावर्ते यांना टोला लगावला.

बैठकीत नेमकं काय झालं?

सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा अनिल परब, शरद पवार आणि एसटी कर्मचारी संघटनेच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत झाली. या एसी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत संपावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची चर्चा झाली. या चर्चेनंतर कृती समितीला आश्वस्त करण्यात आलं. सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत गंभीर असून त्यासोबत आता एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीन कामावर रुजू व्हाव, असं कळकळीचं आवाहन करण्यात आलंय. एकूण 22 एसटी कामगार संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलेले ठळक मुद्दे –

11 हजार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. – पदाधिकारी

कामगारांचं प्रचंड आर्थिक नुकसान होतंय – पदाधिकारी

नोकरी जाऊन कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी व्हायला नको – पदाधिकारी

कामगारांची नोकरी वाचवायला हवी. – पदाधिकारी

न्यायालयात लढा सुरु असताना रस्त्यावर लढा कशासाठी? – पदाधिकारी

ज्या कर्मचाऱ्यांवर आता कारवाई नाहीये, त्यांवर कोणतीही कारवाईही केली जाणार नाही, असंही आश्वासनं देण्यात आलं. – पदाधिकारी

एसटी कर्मचाऱ्यांची प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेऊन एसटी कामगारांना कामावर रुजू व्हावं – पदाधिकारी

सदावर्ते वकील साहेबांनी कर्मचाऱ्यांच्या डोक्यात एक भ्रम निर्माण केला आहे – पदाधिकारी

वकील साहेब स्वतः डिप्रेशनमध्ये आले असावेत – पदाधिकारी

आपली रोजीरोटी टिकली पाहिजे, आपली एसटी टिकली पाहिजे, या अनुषंगानं सर्वसामान्य कुटुंबातील कर्मचाऱ्यांची देखील आहे. एसटी टिकली तर रोजगार टिकणार आहे – पदाधिकारी

कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्याचं आश्वासन – पदाधिकारी

एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतावं – पदाधिकारी

आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं संघटनेचं आवाहन – पदाधिकारी

विलिनीकरणाचा भ्रम चुकीच्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांच्या डोक्यात भरवला जातो आहे – पदाधिकारी

शरद पवारांसोबत बैठकीत शंकांचं निरसन झाल्याची प्रतिक्रिया वेगवेगळ्या एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे. न्यायालय जो निर्णय विलिनीकरणाबाबत देईल, तो सरकार आणि एसटी कर्मचारी दोघांनाही मान्य राहिल, असंही यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.