’53 कोटी द्या, इतक्या जागांवर EVM हॅक करतो’, महाविकास आघाडीच्या खासदाराला ऑफर

Maharashtra Assembly Election 2024 EVM Hack offer : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे EVM हॅक करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सैयद शुजा नावाच्या एका व्यक्तीने महाविकास आघाडीच्या खासदाराला ही ऑफर दिली आहे.

'53 कोटी द्या, इतक्या जागांवर EVM हॅक करतो', महाविकास आघाडीच्या खासदाराला ऑफर
EVMImage Credit source: ECI
Follow us
| Updated on: Nov 15, 2024 | 10:31 AM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. मतदानाला पाच दिवस उरले आहेत. 20 नोव्हेंबरला मतदान आहे. प्रचार अंतिम टप्प्यात असताना राजकीय पारा चांगलाच तापला आहे. या सगळ्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे EVM पुन्हा एकदा चर्चेत आहे. स्वत:ला व्हिसलब्लोअर म्हणवणारा एक व्यक्ती समोर आलाय. भारताच्या EVM मशीनबद्दल स्फोटक दावे करुन तो चर्चेत आहे. सैयद शुजा नावाचा हा व्यक्ती महाराष्ट्रातील नेत्यांना फोन करत आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाची टेक्नोलॉजी वापरुन EVM मशीन हॅक करण्याचा तो दावा करत आहे. EVM हॅक करुन निवडणूक जिंकून देण्याच तो आमिष दाखवतोय. अमेरिकेच्या संरक्षण विभागात कॉन्ट्रॅक्टवर काम करत असल्याचा त्याचा दावा आहे.

सैयद शुजा नावाच्या या माणसाने अलीकडेच महाविकास आघाडीच्या एका ज्येष्ठ खासदाराशी संपर्क साधला. त्यानंतर या खासदाराने एका वृत्तवाहिनीच्या टीमशी संपर्क साधून त्यांना सगळा घटनाक्रम सांगितला. वृत्तवाहिनीच्या टीमने खासदाराचा खासगी मदतनीस असल्याचे भासवून शुजाशी संर्पक साधला. त्याच्या दाव्याच्या पडताळणी करण्याच्या उद्देशाने हा संपर्क साधण्यात आला. तपासामध्ये असं समजलं की, हा तोच व्यक्ती आहे, ज्याने काही वर्षांपूर्वी सरकार EVM द्वारे निवडणूक प्रभावित करत असल्याचा दावा केला होता. आता आपण स्वत: EVM मशीन हॅक करु शकतो, असं त्याचं म्हणणं आहे. 63 जागांवर EVM हॅकिंगसाठी त्याने 53 कोटी रुपयांची मागणी केली.

त्याच्या दाव्यात किती तथ्य

एका पक्षासाठी आणि EVM मशीन हॅक करण्याचा दावा शुजाने पहिल्यांदा केलेला नाही. 21 जानेवारी 2019 रोजी शुजाने लंडनमध्ये भारतीय पत्रकार संघाने आयोजित पत्रकार परिषदेत तो होता. तिथे त्याने व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अनेक स्फोटक दावे केले होते. 2009 ते 2014 दरम्यान इलेक्ट्रॉनिक कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ईसीआईएल) आणि त्यानंतर 2014 लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईवीएम विकसित करणाऱ्या टीमचा भाग असल्याचा शुजाने दावा केला होता. ईसीआयएल आणि निवडणूक आयोगाने शुजाचे आरोप फेटाळले होते. अनेक तज्ञांनी देखील त्याचे दावे फेटाळून लावले होते.

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.