Haribhau Bagde : ‘बाळासाहेबांनी भोंगे काढण्याची घोषणा केली होती, मग काढा भोंगे’, हरिभाऊ बागडेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान, निधी वाटपावरुन नाराजी

'बाळासाहेब ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्याची भूमिका घेतली होती, तर मग भोंगे काढायला काय हरकत आहे. मग मुख्यमंत्र्यानी म्हणावं की बाळासाहेबांचा मुद्दा आहे आणि तिच आमची भूमिका आहे, एवढंच त्यांनी म्हणावं', असं आव्हानच बागडे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलंय.

Haribhau Bagde : 'बाळासाहेबांनी भोंगे काढण्याची घोषणा केली होती, मग काढा भोंगे', हरिभाऊ बागडेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान, निधी वाटपावरुन नाराजी
उद्धव ठाकरे, हरिभाऊ बागडेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 3:57 PM

औरंगाबाद : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भाजप नेत्यांकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची कोंडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. तर शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली नसल्याचं शिवसेना नेते आणि स्वत: उद्धव ठाकरे ठामपणे सांगत आहेत. अशावेळी माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजप आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांनीही या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंना जोरदार टोला हाणलाय. ‘बाळासाहेब ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्याची भूमिका घेतली होती, तर मग भोंगे काढायला काय हरकत आहे. मग मुख्यमंत्र्यानी म्हणावं की बाळासाहेबांचा मुद्दा आहे आणि तिच आमची भूमिका आहे, एवढंच त्यांनी म्हणावं’, असं आव्हानच बागडे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलंय.

शिवसेना आमदारांना 3 कोटी तर भाजप आमदारला 50 लाख!

शिवसेनेच्या आमदारांना 3 कोटी रुपये दिले आणि भाजप आमदारांना फक्त 50 लाख रुपये दिले. आम्हाला अधिकचा पैसा मिळावा, तरच आम्ही लोकांना सुविधा देऊ शकू अशी मागणी आमची आहे. पण त्यांनी तफावत केल्यानं आम्ही डीपीडीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहितीही बागडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मिळालेल्या माहितीनुसार निधी वाटपात असमानता असल्यानं भाजप आमदारांनी निषेध व्यक्त केलाय.

तर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेत दुजाभाव केला. जिल्ह्याबाहेरच्या नेत्यांना एक ते साडे तीन कोटीचा निधी दिला. मात्र, जिल्ह्यातील भाजप आमदारांना केवळ 50 लाखाचा निधी दिला. राजेश टोपे, अमित देशमुख या जिल्ह्याबाहेरील नेत्यांना निधी देण्याबाबत भाजपचा आक्षेप आहे. तसंच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनाही अडीच कोटीचा निधी दिल्यानं भाजप आमदारांनी सभात्याग केल्याची माहिती आमदार अतुल सावे यांनी दिलीय.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्र्यांकडून चेंडू केंद्राच्या कोर्टात

दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन भाष्य केलंय. भोंग्याचा मुद्दा गाजत आहे असं वाटत नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल देशासाठी आहे. त्या संदर्भात गृहमंत्र्यांनी बैठक घेतली. नोटाबंदी, जीएसटी, लॉकडाऊन देशभर केला ना मग भोंगाबंदी देशभर करा ना, असं उद्धव ठाकरे म्हणाले. कोर्टाने भोंग्याबाबत काही सूचना दिल्या आहेत. या खटल्यात केंद्र सरकार पार्टी होती. मी निकाल वाचला नाही. खोटं बोलणार नाही. पण निकाल समजून घेतला. कोर्टाचा निकाल सर्व धर्मीयांना लागू होतो. पण मला तो मुद्दा गौण वाटतो. मला राज्याला पुढे न्यायचं आहे. गुंतवणूक करायची आहे. राज्याचा विकास करायचा आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.