लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा भूकंप, ‘या’ राज्यात भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा भूकंप झाला आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. एका छोट्या पण महत्त्वाच्या राज्यात भाजपाने आघाडी मोडली आहे. भाजपाला जेजेपीची आवश्यकता नाहीय. त्यांच्याशिवाय ते सरकार स्थापन करु शकतात.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा भूकंप, 'या' राज्यात भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा
bjp
Follow us
| Updated on: Mar 12, 2024 | 12:11 PM

Haryana Politics | लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड घडली आहे. एका छोट्या पण महत्त्वाच्या राज्यात भाजपाच्या मुख्यमंत्र्याने राजीनामा दिला आहे. दिल्लीला लागून असलेल्या हरियाणामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. हरियाणामध्ये भाजपाच सरकार आहे. या राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपा आणि जननायक जनता पार्टी (JJP) यांची आघाडी तुटली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्यावरुन ही आघाडी तुटल्याच बोलल जातय. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळाने सुद्धा राजीनामा दिला आहे. मनोहर लाल खट्टर यांच्या राजीनाम्यामुळे सरकार कोणाच बनणार? हा प्रश्न पडू शकतो. पण सरकार भाजपाच स्थापन करेल.

आज दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होईल. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाच्या नव्या सरकारमध्ये संजय भाटिया यांना मुख्यमंत्री बनवलं जाऊ शकतं. नायब सैनी यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते. संजय भाटिया करनालमधून खासदार आहेत. त्यांच्याजागी मनोहर लाल खट्टर यांना करनालमधून लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. जेजेपीचे 4 ते 5 आमदार फुटून भाजपामध्ये सहभागी होऊ शकतात. हरियाणात चंदीगड येथील निवासस्थानी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची बैठक सुरु आहे. सीएम खट्टर यांची अपक्ष आमदारांसोबत बैठका सुरु आहेत.

भाजपाला अशी पण त्यांची गरज नव्हती

भाजपाला जेजेपीची आवश्यकता नाहीय. त्यांच्याशिवाय ते सरकार स्थापन करु शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाला बऱ्याच महिन्यांपासून जेजेपीपासून वेगळ व्हायच होतं. पण दुष्यंत चौटाला तयार नव्हते. अमित शाह, जेपी नड्डा आणि प्रभारी बिप्लब देब म्हणालेले की, भाजपा राज्यातील दहा जागांवर निवडणूक लढवून जिंकेल. सोमवारी दुष्यंत चौटाला यांनी जे.पी.नड्डा यांची भेट घेतली व हिसार, भिवानी-महेंद्रगढ या लोकसभेच्या 2 जागा मागितल्या. आघाडी तुटल्यानंतर भाजपा हरियाणामध्ये अपक्ष आमदारांच्या समर्थनाने आरामात सरकार बनवू शकते. जेजेपीच्या 10 आमदारांपैकी 5 चंडीगड येथे पोहोचले आहेत. जेजेपीचे आमदार देवेंद्र बबली, ईश्वर सिंह, रामनिवास, जोगीराम आणि दादा गौतम चंडीगडमध्ये दाखल झाले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.