शरद पवारांनी काँग्रेसवर टीका केली नाही, ते राहुल गांधींना समजावून सांगतील : हसन मुश्रीफ

"राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रस नेते राहुल गांधींवर टीका केली नाही", असं हसन मुश्रीफ म्हणाले (Hasan Mushrif on Sharad Pawar statement).

शरद पवारांनी काँग्रेसवर टीका केली नाही, ते राहुल गांधींना समजावून सांगतील : हसन मुश्रीफ
Follow us
| Updated on: Jul 01, 2020 | 2:44 PM

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रस नेते राहुल गांधींवर टीका केली नाही (Hasan Mushrif on Sharad Pawar statement). याबाबत राहुल गांधींना पवार समजावून सांगतील. राहुल गांधी ज्या आक्रमकपणाने बोलत आहेत, ते फार चांगलं काम करत आहेत,” असं राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं (Hasan Mushrif on Sharad Pawar statement).

“राहुल गांधी केंद्र सरकारला फार आक्रमकपणे प्रश्न विचारत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या भाषणावर त्यांनी शेरोशायरीतून प्रश्न विचारला आहे. त्याबद्दल आमचं काही मत नाही”, असं हसन मुश्रीफ म्हणाले. याशिवाय “शरद पवार द्विपक्षीय कराराबद्दल बोलले होते. त्यात शस्त्र हाती घ्यायची नाहीत, असं त्यांना म्हणायचं होतं”, असंदेखील हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

हेही वाचा : “खरे राजकारण कोण आणि का करत आहे?” शरद पवारांना काँग्रेसचे उत्तर

भारत-चीन सीमावाद सुरु असताना काँग्रेसकडून सातत्याने केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली जात आहे. भारत आणि चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. याशिवाय काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन भारत-चीन सीमावादावरुन केंद्र सरकारवर टीका केली. त्यानंतर शरद पवार यांनी “ही राजकारणाची वेळ नाही” म्हणत काँग्रेस नेत्यांना टोला लगावला.

“1962 साली 45 हजार चौ.किमीचा भूभाग गेला. ते कसं विसरता येईल? त्यामुळे ही राजकारणाची वेळ नाही”, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसकडून राजू वाघमारे यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. “ज्या पक्षाच्या कार्यकाळात कित्येक युद्ध जिंकण्यात आली, तो पक्ष देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत राजकारण करण्याचा प्रश्नच येत नाही” असं वाघमारे म्हणाले. त्यानंतर राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण आलं आहे.

दरम्यान, पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनाबद्दलही माहिती दिली. “कोरोनाच्या आपत्तीचे इष्टापत्तीत रुपांतर करण्याची संधी ग्रामविकास विभागाला मिळाली आहे. कोरानाच्या काळात आमच्या विभागाने महिला बचतगटांना ऑनलाईन मार्केट उपलब्ध करुन दिली आहे”, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

“अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट या ऑनलाईन विक्री करणार्‍या पोर्टलवर बचतगटांच्या उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे. ही ऑनलाईन विक्री मे महिन्यात सुरु केली. महिला बचतगटांना यामुळे जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. 100 महिला बचतगट आता जोडले गेलेले आहेत. त्यात वाढ करण्याचा ग्रामविकास विभागाचा प्रयत्न आहे. महिला बचत गटांनी आतापर्यंत 85 लाख मास्कची निर्मिती केली”, असंदेखील त्यांनी यावेळी सांगितलं.

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.