कोल्हापूर लोकसभा : धनंजय महाडिकांच्या उमेदवारीला हसन मुश्रीफांचा विरोध
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची संभाव्य नावं निश्चित केली आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यात ही नावं निश्चित करण्यात आली. मात्र, कोल्हापूर लोकसभेच्या जागेवरुन वाद होण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. कारण विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांचं नाव संभाव्य यादीत असताना, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनीही या जागेवर लढण्यास […]
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची संभाव्य नावं निश्चित केली आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यात ही नावं निश्चित करण्यात आली. मात्र, कोल्हापूर लोकसभेच्या जागेवरुन वाद होण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. कारण विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांचं नाव संभाव्य यादीत असताना, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनीही या जागेवर लढण्यास इच्छा बोलून दाखवली आहे.
राष्ट्रवादीच्या बैठकीत कोल्हापूरच्या जागेवर चर्चा झाली. त्यावेळी अर्थात विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांचं नाव संभाव्य यादीत निश्चित करण्यात आले. मात्र, त्याचवेळी हसन मुश्रीफ यांनीही या जागेवरुन इच्छा दर्शवली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत कोल्हापूरच्या जागेवरुन संभ्रम निर्माण झाला.
खासदार धनंजय महाडिक यांच्या माहितीनुसार, “कोल्हापूरच्या लोकसभा उमेदवारीबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र, नाव निश्चित करण्यात आले नाही.”
दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील जागेवरुन लढण्याची इच्छा दर्शवल्याने कोल्हापुरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यात कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी धनंजय महाडिक यांच्याबद्दल नाराजीही पक्षापर्यंत पोहोचवली आहे. त्यात हसन मुश्रीफ यांनी या जागेवरुन लढण्याची तयारी दाखवल्याने शरद पवार यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
आता कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर विद्यमान खासदार धनंजय महाडिक बाजी मारतात की ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ बाजी मारतात, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच.
2014 मधील निकाल
धनंजय महाडिक यांना 2014 च्या निवडणुकीत एकूण 6 लाख 7 हजार मतं मिळाली. त्याचवेळी शिवसेनेचे संजय मंडलिक यांना 5 लाख 74 हजार मतं मिळाली. म्हणजे खासदार महाडिक हे केवळ 31 हजार मतांनी विजयी झाले. कोल्हापूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे 3, राष्ट्रवादीचे 2 आणि भाजपच्या एका आमदाराची ताकद आहे. 17 लाख 22 हजार मतदारांची संख्या याठिकाणी आहे, यात महिला 8 लाख 32 हजार तर पुरुष 8 लाख 89 हजार मतदार आहेत. गेल्या निवडणुकीत 70 टक्के मतदान झालं होतं.
संबंधित बातमी : कोल्हापूर लोकसभा: विरोधक कुणीही असो, लढत मुन्ना विरुद्ध बंटीच!