पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत लोकांनी भाजपचा माज उतरवला, हसन मुश्रीफांचा घणाघात

हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली (Hasan Mushrif slams BJP).

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत लोकांनी भाजपचा माज उतरवला, हसन मुश्रीफांचा घणाघात
Follow us
| Updated on: Dec 05, 2020 | 5:05 PM

सिंधुदुर्ग : “भारतीय जनता पार्टीचा जो उन्माद आणि माज होता तो विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत लोकांनी उतरवला. हे फक्त सरकारचं लक्ष विचलीत करण्याचं काम करत आहेत. आम्ही तीनही पक्ष एकत्रित लढलो तर भाजपचं डिपॉजिट सुद्धा राहणार नाही”, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला (Hasan Mushrif slams BJP).

मुश्रीफ सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालावर आपलं मत मांडलं (Hasan Mushrif slams BJP).

“महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपने केलेला थयथयाट आणि नाटक बघून सुशिक्षित मतदारांनी मतपेटीतून भाजपचा माज उतरवला”, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

“भाजपने गेल्या वर्षभरात अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, अभिनेत्री कंगना रनौत प्रकरण असेल किंवा ईडी-सीबीआयचा गैरवापर करून आपल्या विचारांचे जे लोक नाहीत त्यांना अडचणीत आणण्याचं काम केलं”, असा आरोप त्यांनी केला.

“कोरोना बाधितांचे आकडे जरी कमी झाले तरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोरोना चाचण्या कमी झाल्या, असा आरोप करायचे. मृत्यू कमी झाले तर म्हणायचे मृत्यू दडवले. हा गेल्या एका वर्षातला थयथयाट पाहून लोकं कंटाळली होती. या निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपला चोख प्रत्युत्तर दिलं”, अशी टीका मुश्रीफ यांनी केली.

“कोरोना संकटात राज्याचं आर्थिक स्त्रोत बंद झालं. तरी राज्य सरकारने कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत केली. सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला वेतन दिलं, याची पोचपावती लोकांनी दिली”, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ – सतिश चव्हाण (राष्ट्रवादी)

नागपूर पदवीधर मतदारसंघ – अभिजीत वंजारी (काँग्रेस)

पुणे पदवीधर मतदारसंघ – अरुण लाड (राष्ट्रवादी)

पुणे शिक्षक मतदारसंघ – जयंती आसगावकर (काँग्रेस)

अमरावती शिक्षक मतदारसंघ – किरण सरनाईक (अपक्ष)

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची पोटनिवडणूक – अमरिशभाई पटेल (भाजप)

हेही वाचा :

आता महाविकास आघाडीचे सरकार सांगून पाडणार नाही, थेट कृती करणार: दरेकर 

‘लोकांनी फरफटत यावं अशी भाजपची इच्छा, शेवटी पेरलं तेच उगवलं’, सतेज पाटलांचा खणखणीत टोला

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.