Coronavirus : ‘कोरोना रोखण्यासाठी हवन करा, मी रोज करते, तुम्हीही करा…’, खासदार हेमा मालिनींचं धक्कादायक विधान

हेमा मालिनी म्हणाल्या की, भारतात कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून मी हवन करत आहे. तुम्हीही करा. ('Havan to stop Corona, I do it every day, you do it too ...', MP Hema Malini's shocking statement)

Coronavirus : 'कोरोना रोखण्यासाठी हवन करा, मी रोज करते, तुम्हीही करा...', खासदार हेमा मालिनींचं धक्कादायक विधान
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 5:36 PM

मुंबई : देशात कोरोनाचा कहर कायम आहे. कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या कमी होत असली तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या अजूनही कमी झाली नाही. दुसरीकडे, काळ्या बुरशीच्या नवीन आजारानं आता चिंता वाढवली आहे. कोरोना नियंत्रणात येण्यासाठी लसीकरणावर जोर देण्यात येत आहे. अशात सुपरस्टार असलेल्या मथुराच्या भाजप खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांनी एक विचित्र दावा केला आहे.

हवन केल्यानं कोरोनाला टाळता येतं…

लस टंचाईचं संकट उद्भवलं नसतं तर कोरोना नियंत्रित होण्यास आणखी वेग आला असता. अशा वेळी सुपरस्टार असलेल्या मथुराच्या भाजप खासदार हेमा मालिनी यांनी एक विचित्र दावा केला आहे. त्यांचा दावा आहे की हवन हा कोरोना रोखण्यासाठी योग्य उपाय आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केलं हवन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या दरम्यान, मुंबई येथील हेमा मालिनी यांच्या निवासस्थानी पर्यावरण दिनी हवन आयोजित करण्यात आलं. यावेळी हेमा मालिनी म्हणाल्या की कोरोनापासून बचाव करण्यासाठी हवन करणं योग्य आहे.

हेमा मालिनी शेवटी काय म्हणाल्या?

हेमा मालिनी म्हणाल्या की, भारतात कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून मी हवन करत आहे. मी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला हवन करते. जर सकाळी आणि संध्याकाळी हवन करत धूप लावली तर घरगुती क्लेश होणार नाही. धूपसोबत, कडुलिंबाची पानं आणि शुद्ध तुपाचाही वापर करा. घराचं वातावरण धूप हवनद्वारे शुद्ध होतं. मी रोज हवन करते तूम्हीही करायला हवं.

देशातील कोरोनाची परिस्थिती

दरम्यान, देशात कोरोना संसर्गामध्ये तीव्र घट झाली आहे. मात्र कोरोनाची लागण होण्याची नवीन प्रकरणं कमी असले तरी देशात कोरोनाचा नवा व्हेरीयंट समोर आला आहे. या व्हेरीयंटमुळे कोरोना संक्रमित रूग्णांचं वजन अवघ्या सात दिवसात कमी होतं. हा प्रकार प्रथम ब्राझीलमध्ये आढळला. मात्र आता त्याचं भारतात आगमन निश्चित झाले आहे. अशा परिस्थितीत कोरोनावर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कोरोना प्रतिबंधक लस. मात्र लसीचा तुटवडा असल्यानं लोकांना ही लस दिली जात नाहीये. अनेक शहरांमध्ये 18 ते 44 वयोगटातील लोकांना लसीकरण करण्याची मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Photo : पलक तिवारीने शेअर केले ‘हे’ फोटो; चाहते म्हणाले, ‘मम्मी मारेगी…

Yami Gautam : यामी गौतमनं शेअर केले लग्नातील अनसीन फोटो, चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस

Photo : साउथच्या ‘या’ सुपरस्टारकडे आहे 7 कोटींची व्हॅनिटी व्हॅन, शाहरुख,सलमानलाही टाकलं मागे

दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.