AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा थांबणार? हरियाणाचे मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या सूचना काय?

केंद्र सरकार नव-नवी कारणं शोधून भारत जोडो यात्रेत अडथळे आणण्याचा प्रयत्न करतंय, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा थांबणार? हरियाणाचे मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या सूचना काय?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 11:54 AM

नवी दिल्लीः चीनमध्ये कोरोनाचा (China Corona) नव्याने झालेला उद्रेक पाहता भारताने सावधगिरीची भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo) कोरोना नियमांचे पालन होत नसेल तर ही यात्रा स्थगित करण्यात यावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राहुल गांधींना दिल्या आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी सध्या राजस्थानात आहेत. मांडविया यांनी काल देशातील सर्वच राज्यांना कोरोना नियम पालनासंदर्भात पत्र लिहिले. त्यात राहुल गांधी तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनाही पत्र लिहिले.

भारत जोडो यात्रेत कोरोना गाइडलाइन्सचे कठोर पालन होत नसेल तर, कोविड प्रोटोकॉलचे पालन होत नसेल तर भारत जोडो यात्रा स्थगित करण्यात यावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

राजस्थानचे खासदार पीपी चौधरी, निहाल चंद, देवजी पटेल यांनी आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून भारत जोडो यात्रेतील कोरोना संसर्गासंबंधी चिंता व्यक्त केली होती. देशात मागील काही दिवास कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानात आहे. देशातील विविध राज्यांतील लोक यात सहभागी आहेत. इतर राज्यांतून आलेल्या प्रवाशांमुळे राजस्थानमध्ये कोरोनाचा फैलाव होवू शकतो.

भारत जोडो यात्रेत सहभागी सदस्यांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळत आहेत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खूदेखील यात्रेतून परतल्यावर कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे खबरदारी बाळगण्याची गरज असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा पत्रात लिहिले आहे.

मोदी गुजरातेत मास्क लावून गेले होते का?

दरम्यान, सरकारचा हा नाहक कांगावा असल्याची टीका काँग्रेसकडून होतेय. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे मोदी सरकार घाबरले आहे. सामान्य नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप अशा प्रकारे प्रश्न उपस्थित करत आहे. गुजरात निवडणुकांमध्ये मोदी घरोघरी मास्क लावून गेले होते का? असा सवाल काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केलाय.

संजय राऊतांचीही टीका

तर, केंद्र सरकार नव-नवी कारणं शोधून भारत जोडो यात्रेत अडथळे आणण्याचा प्रयत्न करतंय, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही केला आहे.

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.