बंगळुरूः भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून प्रसिद्ध असलेल्या बंगळुरूमध्ये (Bengaluru) अत्यंत संतापदायक प्रकार समोर आलाय. कर्नाटक (Karnataka) राज्यात पूरस्थितीने (Flood) उग्र रुप धारण केलय. राजधानी बंगळुरूमध्ये सामान्य जनजीवन विस्कळीत झालंय. या पूरस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी कर्नाटक सरकारने तातडीची बैठक बोलावली. मात्र या बैठकीत तिथल्या महसूल मंत्र्यांना डुलकी लागली. विशेष म्हणजे हे छायाचित्रही काढले गेले आणि त्यावर विरोधकांची सडकून टीका होतेय. सोशल मीडियावर काँग्रेसने हे छायाचित्र प्रसिद्ध करत चांगलाच समाचार घेतलाय. असे मंत्री आधी आमदार म्हणून आपणच निवडून दिले आहेत, हे पाहून तिथल्या जनतेमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पूरस्थितीवर बैठक बोलावली. याच विषयावर चर्चा सुरु असताना महसूल मंत्री आर अशोक हे डुलक्या घेताना दिसतायत, असा आरोप काँग्रेसने केलाय. बंगळुरूत पूरस्थितीमुळे मोठं नुकसान होतंय. आयटी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितलतंय. इतर कार्यालये, शाळांना सुटी दिलीय. राज्याची स्थिती एवढी गंभीर असताना मंत्र्यांनी डुलक्या घेणं किती संतापदायक आहे, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
कर्नाटक काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आर अशोक यांचे काही फोटो शेअर करण्यात आलेत. त्यावर कन्नड भाषेत सडकून टीका केली. त्याचा मराठीत अर्थ असा की, राज्यातील पूरस्थितीचा आज डोळे बंद करून आढावा घेतला गेला. बुडण्याचे अनेक प्रकार असतात. काही लोक पूरात, पावसात जलमग्न होत आहेत तर काही जण निद्रामग्न होत आहेत.
ಮುಳುಗುವುದರಲ್ಲಿ ಹಲವು ವಿಧಗಳಿವೆ!
ರಾಜ್ಯದ ಜನ ಮಳೆಯಲ್ಲಿ ಮುಳುಗಿದ್ದಾರೆ,
ಸಚಿವರು ನಿದ್ದೆಯಲ್ಲಿ ಮುಳುಗಿದ್ದಾರೆ!ಪ್ರವಾಹ ಪರಿಶೀಲನೆಯ ವಿಡಿಯೋ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ನಲ್ಲಿ ಸಚಿವ @RAshokaBJP ಅವರ ಭರ್ಜರಿ ನಿದ್ದೆ.
‘ಹಲಾಲ್ ಕಟ್’ ಎಂದರೆ ಥಟ್ನೆ ಎಚ್ಚರಾಗುತ್ತಾರೆ!‘ಚಿಂತೆ ಇಲ್ಲದವಗೆ ಸಂತೆಲೂ ನಿದ್ದೆ’ ಎಂಬ ಮಾತು ಸಚಿವರಿಗೇ ಹೇಳಿದ್ದೇನೋ! pic.twitter.com/e11pzCibwZ
— Karnataka Congress (@INCKarnataka) September 6, 2022
कर्नाटकातील पूरस्थिती गंभीर आहे. बचावासाठी पायाभूत सुविधांवर 300 कोटी रुपयांचा निधी सरकारने जारी केलाय. बंगळुरूतील जनजीवन तर ठप्प आहे. शहरातील बहुतांश भाग पाण्याखाली आहे. वीज, पाणीपुरवठा खंडीत होतोय. सोमवारी बंगळुरू शहरात 79.2 मिमी पाऊस झाला.