Sanjay Raut : हिटलर, मोदी, भाजप, इव्हेंट ते सोशल मीडिया; संजय राऊतांच्या भाषणातील 5 मुद्दे

आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी मोदींची तुलना हिटरशी केली आहे. जाणून घेऊयात राऊतांच्या भाषणातील पाच महत्त्वाचे मुद्दे

Sanjay Raut : हिटलर, मोदी, भाजप, इव्हेंट ते सोशल मीडिया; संजय राऊतांच्या भाषणातील 5 मुद्दे
संजय राऊत Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 4:04 PM

मुंबई : आज पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. त्यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना हिटलरसोबत (Hitler) केली आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपावर टीका करताना राऊत म्हणाले की, हिटलरचं एक आत्मचरित्र आहे. माईन काम्प. यात त्याने सांगितलं राष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रपोगंडा आणि प्रचाराचं महत्त्व फार आहे. तुम्ही कशा प्रकारे प्रचार आणि प्रपोगंडा करता ते महत्त्वाचं आहे. आज आपल्या देशात तेच सुरू आहे. एका निवडणुकीत हिटलरच्या विरोधात प्रचंड प्रचार झाला. त्यावेळी हिटलर म्हणाला आपण एक पोस्टर लावायचं. त्यात कोणत्याही घोषणा नको. केवळ हिटलरचा फोटो लावला. ते लोकांना आवडलं. हिटलर म्हणतो, सामान्य लोकं विचारवंत नसतात. ते वाचत नाहीत. त्यांच्या डोक्यात जाईल अशा गोष्टी करायला पाहिजे. हिटलर इव्हेंट फार करायचा, त्याचप्रमाणे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील तेच करत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी नेमकं काय म्हटले जाणून घेऊयात राऊतांच्या भाषणातील पाच महत्त्वाचे मुद्दे

  1. राऊत यांनी भाजपाच्या इव्हेंट बद्दल बोलताना म्हटले आहे की, हिटलरचं एक आत्मचरित्र आहे. माईन काम्प. यात त्याने सांगितलं राष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रपोगंडा आणि प्रचाराचं महत्त्व फार आहे. तुम्ही कशा प्रकारे प्रचार आणि प्रपोगंडा करता ते महत्त्वाचं आहे. आज आपल्या देशात तेच सुरू आहे. हिटलर इव्हेंट फार करायचा, त्याचप्रमाणे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील तेच करत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
  2. आपल्या देशात विरोधकांना बदनाम करण्याची मोहीम सुरू झाली असल्याचे सजंय राऊत यांनी म्हटले आहे. काँग्रेस ते शिवसेनेची बदनामी होत आहे. ही गोबेल्स निती आहे. आपण या नीतीपासून दूर राहतो. पण त्याच माध्यमातून आपली बदनामी झाली आपण फक्त नैतिकता सांभाळत बसलोय जसं मोदी करतात. मोदी हिटलरला फॉलो करतात. सोशल मीडियातील फौजा पाहिल्या तर मोदी पूर्णपणे हिटरला फॉलो करत असल्याचे दिसून येते असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.
  3. उत्तर प्रदेशातील निवडणुकातही भाजप नेत्यांनी सोशल मीडियाचं ट्रेनिंग दिलं. हिजाबपासून अनेक मुद्दे त्यांनी प्रचारात आणले. त्या मानाने आपली टीम लहान आहे. परत सांगतो हे युद्ध आहे. हे राज्य टिकवायचं असेल या प्रवृत्ती विरुद्ध लढायचं असेल तर समोरच्या लोकांची ताकद आणि त्यांच्या भूमिकेनुसार आपल्या लोकांना तयार करावं लागणार असल्याचे देखील यावेळी संजय राऊत यांनी म्हटले आहे.
  4. मुंबईसारख्या शहरात सुशातसिंग राजपूत, कंगना राणावत प्रकरणात महाविकास आघाडीवर आरोप केले जातात. त्यावर त्यांचा भाजपाचा सोशल मीडिया सेल नियोजनबद्द पद्धतीने काम करतो. ते शंभरवेळा खोटं बोलतात. मात्र लोकांना ते खरे वाटते. ही पद्धत महाराष्ट्रात सुरू झालीये. याच्याशी सामना करायचा असेल तर आपल्याला सोशल मीडियाला एक कार्पोरेट टच देण्याची गरज असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
  5. याच भाषणामध्ये त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. भलेही सोमय्या आणि त्यांच्या मुलाला जामीन मिळाला असेल, पण मी एकाच वाक्यात सांगितलं बापबेटे तुरुंगात जातील. कारण मी जे बोलतो ते मोजकं बोलतो असे देखील यावेळी संजय राऊत यांनी म्हटले आहे.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.