नड्डांच्या ताफ्यावर हल्ला, केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; राज्यपालांकडून मागवला रिपोर्ट

| Updated on: Dec 10, 2020 | 8:07 PM

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची केंद्र सरकारने गंभीरपणे दखल घेतली आहे. (Home Minister Amit Shah Orders Probe Into Attack On BJP Chief's Convoy In Bengal)

नड्डांच्या ताफ्यावर हल्ला, केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; राज्यपालांकडून मागवला रिपोर्ट
Follow us on

नवी दिल्ली: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची केंद्र सरकारने गंभीरपणे दखल घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वत: या हल्ल्याचा निषेध नोंदवला असून पश्चिम बंगालच्या राज्यापालांना याबाबतचा रिपोर्ट पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Home Minister Amit Shah Orders Probe Into Attack On BJP Chief’s Convoy In Bengal)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जे. पी. नड्डा यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने राज्यपाल जगदीप धनखड यांच्यासह बंगालचे डीजीपी आणि मुख्यसचिवांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतचा अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत. पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगण्यात गुरुवारी टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. यावेळी टीएमसी कार्यकर्त्यांनी नड्डा यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला आणि दगडफेक केल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे.

राष्ट्रपती राजवट लागू करा: रॉय

या हल्ल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनी पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता राज्यात तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, अशी मागणी रॉय यांनी केली आहे.

अत्याचार, अराजकता, अंधकाराचं युग: शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. बंगालमध्ये जेपी नड्डा यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे. या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. केंद्र सरकारने या हल्ल्याची गंभीरपणे दखल घेतली आहे. बंगाल सरकारला या प्रायोजित हिंसेचं राज्यातील शांतताप्रिय जनतेला उत्तर द्यावंच लागणार आहे, असं शहा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी अत्याचार, अंधकार आणि अराजकतेचं युग आणलं आहे, अशी टीकाही शहा यांनी केली.

 

चौकशी झाली पाहिजे: राजनाथ सिंह

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही या घटनेनंतर नड्डा यांच्याशी फोनवरून चर्चा करून माहिती घेतली. या घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये कायद्याचं राज्य राहिलं नसल्याचं दिसून येतं, अशी प्रतिक्रिया राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. लोकशाहीत राजकीय नेत्यांना अशा पद्धतीने टार्गेट करणं अत्यंत चिंताजनक आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, असं राजनाथ सिंह म्हणाले.

नड्डा यांच्या कार्यक्रमाची माहिती बंगाल पोलिसांना दिली होती. पण पोलिसांसमोरच नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला घडवून आणला. गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. हे पोलिसांचं अपयश आहे, असं भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी सांगितलं.

 

सुरक्षा असतानाही हल्ला झालाच कसा?: ममता

नड्डा यांच्यावरील हल्ला ही नौटंकी असल्याची टीका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. बीएसएफ आणि सीआरपीएफचे जवान सुरक्षेसाठी तैनात असताना नड्डा यांच्यावर हल्ला होईलच कसा? असा सवाल करतानाच या हल्ल्याचे व्हिडीओ भाजपने तयार केलेच कसे? असा सवालही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. भाजपच्या रॅलीला लोकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लोकांना रॅलीमध्ये खेचून आणण्यासाठीच हल्ल्याची योजना केल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच शेतकरी आंदोलनावरून लक्ष विचलीत करण्याचा भाजपचा हा डाव असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (Home Minister Amit Shah Orders Probe Into Attack On BJP Chief’s Convoy In Bengal)

संबंधित बातम्या:

जेपी नड्डांवरील हल्ल्याचे पडसाद, भाजपचा मुंबईत रास्तारोको; राज्यभर आंदोलनाचा इशारा

PHOTO | नड्डांच्या ताफ्यावर दगडफेक, भाजप टीएमसीचं गुंडाराज संपवून सत्तेत येणार: नड्डा

इंधन दरवाढीचा भडका, शिवसैनिक गॅस सिलिंडर घेऊन रस्त्यावर; मुंबईत जोरदार आंदोलन

पश्चिम बंगाल : जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक, वाहनांची तोडफोड, टीएमसी कार्यकर्त्यांवर आरोप

(Home Minister Amit Shah Orders Probe Into Attack On BJP Chief’s Convoy In Bengal)