15 फेब्रुवारीला नागपूरहून मुंबईला आल्याची गृहमंत्र्यांची कबुली, पवारांनी केलेला होम क्वारंटाईनचा दावा

इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियातून चुकीच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे मी फार व्यथित झालो आहे, असं अनिल देशमुख म्हणाले (Anil Deshmukh clarification on Home Quarantine)

15 फेब्रुवारीला नागपूरहून मुंबईला आल्याची गृहमंत्र्यांची कबुली, पवारांनी केलेला होम क्वारंटाईनचा दावा
Anil Deshmukh
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 8:29 AM

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख हे 15 फेब्रुवारी रोजी होम आयसोलेशनमध्ये होते असं म्हणता तर मग त्यांनी पत्रकार परिषद कशी घेतली? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केला होता. त्यावर अनिल देशमुख यांनी ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. (Home Minister Anil Deshmukh clarification on Home Quarantine issue raised by Devendra Fadnavis)

अनिल देशमुख काय म्हणतात?

“गेल्या काही दिवसांपासून काही लोकांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियातून चुकीच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे मी फार व्यथित झालो आहे. कोरोनाच्या एक वर्षाच्या काळात आमच्या पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. नागपूरला पाच फेब्रुवारीला मी कोरोनाबाधित झालो. त्यानंतर 5 ते 15 फेब्रुवारी मी नागपूरच्या एलिक्झर रुग्णालयात दाखल होतो. 15 फेब्रुवारीला जेव्हा मला डिस्चार्ज मिळाला, तेव्हा होम क्वारंटाईनसाठी मी खासगी विमानाने नागपूरहून लगेच मुंबईला आलो” अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

“होम क्वारंटाईन झाल्यानंतर मी लॉकडाऊनच्या सूचनेप्रमाणे रात्री उशिरा पार्कमध्ये प्राणायाम करण्यासाठी जात होतो. नागपूरमध्ये मी हॉस्पिटलला जाण्याच्या वेळेदरम्यान आणि मुंबईती होम क्वारंटाईनच्या दरम्यान मी अनेकदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका किंवा कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो. होम क्वारंटाईननंतर एक मार्चपासून आमचं अधिवेशन होतं. त्याच्या कामाला मी लागलो. त्या दरम्यान अधिवेशनासाठी आमची जी प्रश्नोत्तरं होती, लक्षवेधी सूचना होत्या, त्याच्या मीटिंगसाठी माझ्या शासकीय निवासस्थानी अनेक अधिकारी येत होते. त्यानंतर शासकीय कामासाठी पहिल्यांदा 28 फेब्रुवारीला घराच्या बाहेर पडलो. जनतेत चुकीची माहिती किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.” असं स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिलं आहे.

फडणवीसांनी काय केला होता आरोप

देवेंद्र फडणवीस यांनी थेट 15 फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओच ट्विट केला आहे. “देशमुख यांनीच हा व्हिडीओ ट्विट केला होता. 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यमप्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?”, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. यातून फडणवीस यांना परमबीर सिंग यांनी केलेला दावा खरा असल्याचं म्हटलं आहे. (Home Minister Anil Deshmukh clarification on Home Quarantine issue raised by Devendra Fadnavis)

काय म्हणाले पवार?

परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरून 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत अनील देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे. देशमुख हॉस्पीटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे आणि 15 ते 27 फेब्रुवारी पर्यंत होम कॉरेन्टाईन चा सल्ला डॉक्टरांचा होता. असं असताना सिंग कशाच्या आधारावर देशमुखांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचं सिंग सांगत आहेत, असा सवाल शरद पवारांनी केला आहे.

संबंधित बातम्या:

मग हे अनिल देशमुख कोण?; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सवाल

Sharad Pawar | पत्रकारांच्या प्रश्नांवर शरद पवार म्हणाले “इनफ इज इनफ”

अनिल देशमुखांकडे कोणतं गुपित, ज्यामुळे पवारांनी 24 तासांत भूमिका बदलली? भाजप आक्रमक

(Home Minister Anil Deshmukh clarification on Home Quarantine issue raised by Devendra Fadnavis)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.