Video : Rajya Sabha Election Results 2022 : ते पराभवाचं खापर अपक्षांवर कसं फोडू शकतात? राऊतांचा आरोप देवेंद्र भुयारांनी आकडेवारीसह खोडला

मी पहिल्या क्रमांकाचं मत मी अजित दादांशी चर्चा करून संजय पवारांना दिलं. दुसरं मत मी संजय राऊतांना दिलं. तीसरं मत प्रफुल्ल पटेल यांना दिलं. असा खुलासा देवेंद्र भुयार यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केला.

Video : Rajya Sabha Election Results 2022 : ते पराभवाचं खापर अपक्षांवर कसं फोडू शकतात? राऊतांचा आरोप देवेंद्र भुयारांनी आकडेवारीसह खोडला
राऊतांचा आरोप देवेंद्र भुयारांनी आकडेवारीसह खोडला
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 10:41 AM

अमरावती : आम्ही पहिल्या पसंतीचं मतं संजय पवारांना (Sanjay Pawar) दिलं, असं स्पष्टीकरण अपक्ष आमदार (Independent MLA) देवेंद्र भुयार यांनी दिलं. दुसऱ्या पसंतीचं मतं संजय राऊत यांना दिलं असं देवेंद्र भुयार म्हणाताहेत. संजय राऊत पराभवाचं (defeated) खापर अपक्षांवरती कशाप्रकारे फोडू शकतात. अपक्षांवर होत असलेले आरोप देवेंद्र भुयार यांनी फेटाळून लावले. देवेंद्र भुयार म्हणाले, संजय राऊत पराभवाबद्दल नेमकं काय म्हणाले हे मला माहीत नाही. पण, ते पराभवाचं खापर अपक्षांवर कसं काय फोडू शकतात. पहिल्या पसंतीचं मतं आम्ही संजय पवारांना दिलेलं आहे. 33 मतं संजय पवारांना मिळालेली आहेत. ती पहिल्या क्रमांकाचीच मिळाली आहेत ना. दुसऱ्या क्रमांकाची मतं ही संजय पवार यांना कमी मिळालीत. संजय पवारांना पहिल्या पसंतीची मतं 33 आहेत. संजय महाडीकांना 23 मतं पहिल्या पसंतीची आहेत. दहा मतांचा फरक आहे. या फरकाला आम्ही अपक्षचं जबाबदार आहोत ना. आम्हीचं पहिल्या क्रमांकाचं मतं दिलं. दुसऱ्या क्रमांकाची मतं जी संजय पवारांना मिळणार होते, ती मिळाली नाहीत. हे त्यांच्या पराभवाचं खरं कारण आहे. याशिवाय बऱ्याच गोष्टी त्याला कारणीभूत आहेत, असंही देवेंद्र भुयार यांनी स्पष्ट केलंय.

पाहा व्हिडीओ काय म्हणालेत, देवेंद्र भुयार

अजित पवारांशी बोलून केलं मतदान

देवेंद्र भुयार म्हणाले, मी महाविकास आघाडीसोबत पहिल्या दिवसापासून आहे. सरकार स्थापन होण्याच्या पूर्वीपासून आहे. सरकार स्थापन करायला शिवसेना नंतर आली. मी अजित पवार, शरद पवार यांच्यासोबत पहिल्या दिवसापासून आहे. माझ्या अंगावर गुलाल होता त्या दिवसापासून मी राष्ट्रवादीसोबत आहे. मग, ते आमच्यावर कसं काय खापर फोडू शकतात. कोण कुणावर खापर फोडते त्याच्याशी मला काही देणंघेणं नाही. पण, मी पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडीसोबत आहे. त्यामुळं मी पहिल्या क्रमांकाचं मत मी अजित दादांशी चर्चा करून संजय पवारांना दिलं. दुसरं मत मी संजय राऊतांना दिलं. तीसरं मत प्रफुल्ल पटेल यांना दिलं. असा खुलासा देवेंद्र भुयार यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केला.

हे सुद्धा वाचा

कुणाला किती मतं मिळालीत

शिवसेनेच्या संजय राऊत यांना 41 मते मिळाली. ते टोकावर मतं घेऊन विजयी झालेत. भाजपाच्या पीयूष गोयल व अनिल बोंडे यांना प्रत्येकी 48 मतं मिळाली. पण, शिवसेनेतर्फे रिंगणात असलेले संजय पवार यांना 39 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात उभे असलेले भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक यांना 41 मते मिळाली. दोन मतांनी संजय पवार यांचा पराभव झाला. अपक्षांची मतं फुटल्यानं हा पराभव झाल्याचं संजय राऊत म्हणाले. यावर देवेंद्र भुयार यांनी सारी आकडेवारी स्पष्ट करून सांगितली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.