MIM ची तुम्हाला प्रस्ताव देण्याची हिंमतच कशी होते ? मनसे नेते देशपांडेच्या सवालानं शिवसेनेची कोंडी
"ज्याचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांना बदलून आता औरंगजेब झालेले आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराज मैदानात दगड मारण्याचं काम करत आहेत. त्यांना काश्मिरी पंडीतांपेक्षा मुस्लीम अतिरेखी जास्त जवळचे वाटतात.
मुंबई – “ज्याचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांना बदलून आता औरंगजेब झालेले आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराज मैदानात दगड मारण्याचं काम करत आहेत. त्यांना काश्मिरी पंडीतांपेक्षा मुस्लीम अतिरेखी जास्त जवळचे वाटतात. मला असं वाटतं की एमआयएम (MIM) भररस्त्यात त्यांची छेड काढते, त्यांच्यााकडून काय अपेक्षा काय ठेवणार, ज्या पद्धतीने आदर्श बदलले, त्याप्रमाणे संगत देखील बदलली की मित्र सुध्दा बदलतात” अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे (sandip deshpande) यांनी शिवसेनेवरती (shivsena) केली आहे. “याची कारण अशी आहेत की, आता मज्जाचं मजा आहे. मुख्यमंत्री पद मिळालं आहे, त्यामुळे एमआयएम जवळ येवो, नाहीतर अबु आझमी जवळ येवो, नाहीतर अजून कोणी जवळ येवो आम्हाला आमच्या सत्तेशी मतबल आहे. यांना कशाशी देण घेण नाही. त्यामुळे आमची छेड जरी कोणी काढली तरी आम्ही आनंदात आहोत. राग येत नाही” असा टोला संदीप देशपांडे मुख्यमंत्र्यांना लगावला.
सरळरीत्या शिवसेनेला ऑफर देतो याचा अर्थ काय होतो
“तुमचं हिंदुत्व एवढं पक्क असतं, तर एमआयएमची हिंमत कशी झाली तुम्हाला ऑफर द्यायची. कुठे तरी धूर असेल म्हणून तर आग लागली ना ? एमआयएम सारखा पक्ष जो अत्यंत भयंकर धर्मवादी पक्ष आहे. तो सरळरीत्या शिवसेनेला ऑफर देतो याचा अर्थ असा होतो, की कुठंतरी पाणी मुरतंय. तुमची संगत बघतात लोक, तुमच्या संगतीला कोण आहे. समाजवादी पक्ष आहे अबु आझमींचा, नवाब मलिक आहे. ज्यांची तुम्ही पाठराखण करताय म्हणून एमआयएमची हिंमत झाली याच्या आगोदर कधीही हिंमत झाली नाही. कारण तुमची संगत तुम्ही कोणाला पाठिंबा देताय, तुम्ही काश्मिरी पंडितापेक्षा अतिरेख्यांची बाजू घेता. का तुम्हाला एमआयएम प्रस्ताव देणार नाही” असा सवाल देखील संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
इम्तियाज जलील यांनी ऑफर केल्यापासून राजकारण तापलं
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत येण्याची इच्छा बोलावून दाखवल्यापासून राजकारण चांगलचं तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप आणि मनसेचे अनेक नेत्यांनी त्यामुळे शिवसेनेला टार्गेट केलं आहे. संजय राऊत यांनी एमआयएम ही भाजपाची बी टीम असल्याचं म्हटलं आहे. तसेच उत्तरप्रदेशात त्यांच्यामुळे भाजपाचा विजय झाला असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. नुकतीच शिवसेनेच्या खासदारांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला असून सगळे खासदार काही दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.