Rajya Sabha Election 2022: राज्यसभेसाठी 42 मतांची गरज नाही. मग किती मतांचा कोटा हवाय?; समजून घ्या नवं गणित!

Rajya Sabha Election 2022: महाराष्ट्र विधानसभेत 288 आमदार आहेत. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं नुकतंच निधन झालं. तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. त्यांनी मतदान करता यावं म्हणून कोर्टात अर्ज केला होता.

Rajya Sabha Election 2022: राज्यसभेसाठी 42 मतांची गरज नाही. मग किती मतांचा कोटा हवाय?; समजून घ्या नवं गणित!
राज्यसभेसाठी 42 मतांची गरज नाही. मग किती मतांचा कोटा हवाय?; समजून घ्या नवं गणित!Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 6:16 PM

मुंबई: राज्यसभा निवडणुकीला (Rajya Sabha Election) अवघे काही तास उरले आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या जोरबैठका सुरू झाल्या आहेत. आपआपले मित्रं पक्ष आपल्यासोबत राहावेत म्हणून जोरबैठका सुरू आहेत. तसेच अपक्षांनीही कोणत्याही अमिषा बळी पडू नये आणि अपक्षांना आपल्याकडे वळवता यावेत असे दोन्ही बाजूंकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे काही पक्षांच्या बड्या नेत्यांनी तर आमदारांसोबतच राहायचे ठरवले आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (aaditya thackeray) आणि संजय राऊत (sanjay raut) हे दोघेही आज आमदारांसोबत रात्री मुक्काम करणार आहेत. आमदार फुटू नयेत म्हणून हा आटापिटा सुरू असतानाच आता मतदानासाठी आमदारांचा कोटा कमी झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. मतांचा कोटा कमी झाल्याने आता त्यानुसार गणितं मांडली जात आहेत. अपक्षांना गृहित धरून आणि काही अपक्षांना वगळून किती आमदारांचा कोटा होतो याची आकडेमोड सुरू आहे.

नवा कोटा कितीचा?

महाराष्ट्र विधानसभेत 288 आमदार आहेत. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं नुकतंच निधन झालं. तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. त्यांनी मतदान करता यावं म्हणून कोर्टात अर्ज केला होता. पण सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे सध्या विधानसभेत 285 आमदार आहेत. परिणामी जिंकण्यासाठी 40.71 मतांची गरज आहे.

हे सुद्धा वाचा

कसं आहे गणित?

राज्यविधानसभेत भाजपचे 106 आमदार आहेत. तर शिवसेनेकडे 56, एनसीपीकडे 53 आणि काँग्रेसकडे 44 आमदार आहेत. या आकडेवारीनुसार काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमदेवार सहज विजयी होणार आहे. तर, पुरेसं संख्याबळ असल्याने भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून जाणार आहेत. मात्र, शिवसेनेने सहावा आणि भाजपने सातवा उमेदवार उतरवल्याने पेच वाढला आहे. तिसऱ्या उमेदवारासाठी भाजपकडे 22 मते आहेत. तर शिवसेनेकडे दुसऱ्या उमेदवारासाठी 14 मते आहे. भाजपला 6 अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपची संख्या 113 होते. त्यामुळे तिसऱ्या उमेदवारासाठी भाजपकडे 29 मते होतात.

दुसरीकडे सत्ताधारी महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. यात शिवसेना, एनसीपी आणि काँग्रसचे मिळून 153 आमदार आहेत. 8 अपक्ष आणि 8 छोट्या पक्षाचे आमदारही आघाडीच्या बाजूने आहेत. त्यामुळे अपक्ष आणि छोट्या पक्षांना सोडून शिवसेनेकडे 27 अतिरिक्त मते राहणार आहेत. या अपक्षांनी आणि छोट्या पक्षांनी महाविकास आघाडीला मते दिली तर ही संख्या 43 वर पोहोचेल. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार सहज निवडून येईल. असं असलं तरी उद्याच निवडणुकीचं सर्व चित्रं स्पष्ट होणार आहे.

जगतापांसाठी एअर ॲब्यूलन्स

चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे आजारी आहेत. ते उपचारासाठी अमेरिकेतही गेले होते. मात्र त्यांची प्रकृती अजूनही स्थिर नाही. मात्र, राज्यसभेसाठी त्यांचं मत महत्त्वाचं असल्याने त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने उद्या मुंबईत आणलं जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.