एक राजा बिनडोक, तर दुसऱ्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर, प्रकाश आंबेडकरांचा उदयनराजे-संभाजीराजेंवर घणाघात
भाजपने त्यांना (उदयनराजे) राज्यसभेत कसं पाठवलं तेच कळत नाही, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी आश्चर्य व्यक्त केलं.
मुंबई : मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर करताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सडकून टीका केली. “एक राजा तर बिनडोक आहे, आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा असं म्हणतात’ अशा शब्दात प्रकाश आंबेडकर उदयनराजेंवर बरसले. तर संभाजीराजे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत आहेत, अशी टीका त्यांनी केली. (Prakash Ambedkar slams Udayanraje Bhosle and Sambhajiraje)
‘एक राजा तर बिनडोक आहे. असं मी म्हणेन, दुसरे संभाजीराजे आहेत, त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत आहेत, असं मला दिसतंय’ असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तुम्ही उदयनराजेंना अंगावर घेताय का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ‘मी अंगावर घ्यायला कोणालाच भ्यायलेलो नाही. ज्या माणसाला घटना माहिती नाही. आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा, असं ते म्हणतात. भाजपने यांना राज्यसभेवर कसं पाठवलं तेच कळत नाही’ असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा मराठा समाज स्वीकारणार का, हा प्रश्न आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
‘सुरेशदादा पाटील यांच्याशी बोलणं झालं. 10 ऑक्टोबरच्या मराठा आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षण वेगळं आणि ओबीसी आरक्षण वेगळं, कोणत्याही परिस्थितीत ओबीसींच्या आरक्षणात मागणी करु नका, ही त्यांना विनंती केल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.
सामंजस्य बिघडताना दिसत असल्याने आम्ही पाठिंबा जाहीर केला. आरक्षण संघर्ष समिती किंवा इतरांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत थांबण्याची विनंती आहे. फाटे फोडण्याचा प्रयत्न करुन मराठा संघटनांत कलह होण्याची शक्यता आहे. त्यातून आक्रमक भूमिका घेऊन महाराष्ट्रातील सामंजस्य बिघडू नये, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली.. (Prakash Ambedkar slams Udayanraje Bhosle and Sambhajiraje)
दोन्ही पक्षांनी ठाम राहावं, त्यामुळे सामंजस्य आणि शांतीचं वातावरण राहील. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका, अशी आमची भूमिका जाहीर असल्याचंही त्यांनी सांगितलं. एसबीसी आरक्षण पूर्वीही होतं. फक्त शिक्षण क्षेत्रात होतं. एसटी-एससीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप मिळत नव्हती, त्यामुळे त्यांना फ्रीशीप मिळत होती. नंतर आर्थिक निकषावर फ्रीशीप देण्यात आली त्याचा सर्वांनाच फायदा झाला. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही त्यामुळे त्यांना एसबीसीमध्ये आरक्षण मिळू शकत नाही ही शासनाची अट चुकीची असून घटनेला धरुन नाही. आरक्षण कुणाला द्यायचं कुणाला नाही हा राज्याचा अधिकार नाही तो केंद्राचा अधिकार आहे, केंद्राने दुरुस्ती केली, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
पाहा व्हिडीओ :
मराठा आरक्षणाला पाठिंबा, पण ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही, 10 ऑक्टोबरला होणाऱ्या ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा : प्रकाश आंबेडकर https://t.co/ZgbSAF7a8M pic.twitter.com/GR4q04KRXs
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 8, 2020
(Prakash Ambedkar slams Udayanraje Bhosle and Sambhajiraje)