AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : शाब्दिक बाचाबाचीनंतर नगरसेविका एकमेकांच्या अंगावर धावून गेल्या! मीरा भाईंदर पालिकेत राडा

mira bhayandar : भाजपचा पार्टी विथ डिफरन्सचा चेहरा यानिमित्तानं समोर आल्याची चर्चा रंगली आहे.

Video : शाब्दिक बाचाबाचीनंतर नगरसेविका एकमेकांच्या अंगावर धावून गेल्या! मीरा भाईंदर पालिकेत राडा
तुफान बाचाबाची...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 7:17 AM

मीरा-भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या (Mira Bhayandar Municipality) महासभेत रणकंदन पाहायला मिळालं. अपशब्दाचा वापर करत नगरसेविका एकमेकांच्या अंगावर धावून गेल्यात. त्यामुळे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेला मंगळवारी अक्षरश: आखाड्याचे स्वरुप आलं होतं. नगरसेविकांचे (Corporator Fight) एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, अपशब्दांचा वापर, यामुळे वातावरणात तापलं होतं. निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी सभागृहात अखेर सुरक्षा रक्षकांना पाचारण करावं लागलं. गीता जैन यांनी शहरात सुरु असलेल्या भूमिगत गटार योजनेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नानंतर लगेचच वादाला तोंड फुटले. यावेळी भाजपच्या नगरसेविका हेतल परमार आणि गीता जैन यांच्या शाब्दिक देवाण घेवाण झाली. हा वाद वाढत गेला आणि परमार यांनी थेट जैन यांच्या आसनाकडे धाव घेतली. यावेळी गीता जैन (Geeta Jain) देखील आक्रमक झाल्या. यावेळी अपशब्दांचा जोरदार वापर झाला. पाण्याच्या बाटल्याही मारण्यासाठी उगारण्यात आल्या.

दोन्ही नगरसेविका आपसात भिडणार असल्याचे लक्षात येताच पीठासीन अधिकारी असलेले हसमुख गेहलोत यांनी सभागृहात महिला सुरक्षा रक्षक पाचारण केले. मात्र त्यानंतरही वाद सुरुच राहिला. अखेर सर्वपक्षीय नगरसेवकांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण शांत झाले.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

वाद का झाला?

पालिकेच्या गार्डनमध्ये भाजपचे नगरसेवक अरविंद शेट्टी यांनी बार आणि रेस्टॉरंट उभारलं. त्यास परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता देण्यावरुन राडा झाला. भाजप नगरसेविका नीला सोन्स यांनी प्रस्तावाला विरोध केला. गार्डनमध्ये बार नको, अशी भूमिका घेण्यात आल्यानं भाजपचा पार्टी विथ डिफरन्सचा चेहरा यानिमित्तानं समोर आल्याची चर्चा रंगली आहे.

प्रस्तावाला मान्यता देण्यावरुन वाद झाला. शब्दाला शब्द वाढत गेला. नगरसेवक हमरीतुमरीवर आले. शिवीगाळही झाली. शिवाय नगरसेवक आणि आमदार गीता जैन यांच्यावर बाटली फेकण्याचा प्रयत्न झाला.

बारला विरोध करणाऱ्या भाजप नगरसेविका नीला जोन्स यांच्या बाजूलाच अरविंद शेट्टी बसले होते. नीला सोन्स यांनी केलेला विरोध पाहून अरविंद शेट्टीदेखील संतापले. त्यांनी सोन्स यांच्यावर ब्लॅकमेलर असल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपांवरुन वादाला सुरुवात झाली आणि अखेर महिला सुरक्षारक्षकांना आणून वातावरण शांत करण्याची नामुष्की ओढावली.

'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण.
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?.
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे.
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?.
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई.
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या.
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट.
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.