नगरबाहेरच्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही, रेमडेसिव्हीर वादावर सुजय विखे-पाटलांनी दंड थोपटले

माझी बांधिलकी नगर जिल्ह्यातील जनतेशी आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीला उत्तर देण्यास बंधनकारक नाही. | remdesivir injection Sujay Vikhe Patil

नगरबाहेरच्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही, रेमडेसिव्हीर वादावर सुजय विखे-पाटलांनी दंड थोपटले
सुजय विखे-पाटील, भाजप खासदार
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 12:59 PM

अहमदनगर: दिल्लीतून नगर जिल्ह्यासाठी परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन (remdesivir injection) घेऊन आल्यामुळे वादात सापडलेले भाजप खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe Patil)  आता प्रतिस्पर्ध्यांविरोधात दंड थोपटून उभे राहिले आहेत. या संपूर्ण प्रकरणात मी नगर जिल्ह्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीला उत्तर देण्यास बांधील नाही. जनतेने निवडून दिलेल्यान नगरमधील कोणत्याही लोकप्रतिनिधीने मला प्रश्न विचारला तर मी त्यांना सर्व पुरावे देईन, असे सुजय विखे-पाटील यांनी म्हटले. (BJP MP Sujay Vikhe Patil explanation on remdesivir injection purchase controversy)

ते मंगळवारी अहदनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सुजय विखे-पाटील यांनी परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करुन आणल्यामुळे उच्च न्यायालयात त्यांच्याविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे सुजय विखे-पाटील यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुजय विखे-पाटील मंगळवारी प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. यावेळी त्यांनी म्हटले की, मी किती रेमडेसिविर इंजेक्शन्स खरेदी करुन आणली याचा उल्लेख केलेला नाही. मला यावर राजकारण करायचे नाही. माझी बांधिलकी नगर जिल्ह्यातील जनतेशी आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीला उत्तर देण्यास बंधनकारक नाही, असे सुजय विखे-पाटील यांनी म्हटले.

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; हॉटेलच्या किचनमध्ये लपवलेला रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा हस्तगत

‘नगर जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराने प्रश्न उपस्थित केला का?’

नगर जिल्ह्यात 12 आमदार आहेत. एकाही आमदाराने या सगळ्याविषयी फसवेगिरीचा प्रश्न उपस्थित केला आहे का? त्यांना हा स्टंट वाटत असेल तर मी त्यांना उत्तर द्यायला तयार आहे. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने मला प्रश्न विचारला तर मी त्याला सर्व पुरावे देईन. माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला तर माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. खासदार बाळासाहेब विखे-पाटील यांच्यापासून आमचे कुटुंब जिल्ह्यात कार्यरत आहे. जनतेने कधीही आमची साथ सोडलेली नाही. मी कारवाईला घाबरत नाही. आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, असे सुजय विखे-पाटील यांनी सांगितले. संबंधित बातम्या:

आनंदाची बातमी! राज्यातील कोरोनाची लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओसरणार; टास्क फोर्सचा अंदाज

सुजय विखे पाटलांची गुपचूप मोहीम, दिल्लीवरुन विशेष विमानाने इंजेक्शनचा मोठा साठा नगरमध्ये

सुजय विखेंना गनिमी कावा भोवण्याची चिन्हं, दिल्लीवरुन आणलेल्या इंजेक्शनप्रकरणी हायकोर्ट आक्रमक

(BJP MP Sujay Vikhe Patil explanation on remdesivir injection purchase controversy)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.