चार वर्षात मोदी-शहांपासून गडकरींपर्यंत सर्वांकडे गाऱ्हाणं मांडलं; खडसेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर

एकनाथ खडसेंना माझ्याविषयी काही आक्षेप होते तर त्यांनी वरिष्ठांकडे माझ्या तक्रारी करायच्या होत्या, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

चार वर्षात मोदी-शहांपासून गडकरींपर्यंत सर्वांकडे गाऱ्हाणं मांडलं; खडसेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 11:38 AM

जळगाव: एकनाथ खडसेंना माझ्याविषयी काही आक्षेप होते तर त्यांनी वरिष्ठांकडे माझ्या तक्रारी करायच्या होत्या, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अमित शहा आणि नितीन गडकरींपर्यंत सर्वांकडे मी तक्रारी मांडल्या. काही नेत्यांकडे तर तासतासभर बसून सर्व मुद्दे मांडले. पण न्याय मिळाला नाही. त्यामुळेच हे पाऊल उचलावं लागल्याचा पलटवार खडसे यांनी केला आहे. (i raised my complaint front of narendra modi and amit shah, says eknath khadse)

‘टीव्ही9 मराठी’शी खास बातचीत करताना एकनाथ खडसे यांनी पहिल्यांदाच हा गौप्यस्फोट केला. फडणवीसांच्या कार्यपद्धतीबाबत आणि माझ्याविरोधात रचण्यात आलेल्या षडयंत्रांबाबत मी गेल्या चार वर्षात सर्व वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा, अरुण जेटली, सुषमा स्वराज, नितीन गडकरी यांच्यासह इतर नेत्यांकडे मी गाऱ्हाणी मांडली. गडकरींकडेही अनेकदा तक्रारी केल्या. सर्वांनी निमूटपणे त्या ऐकून घेतल्या. पण कुणीही माझ्यावरील अन्याय दूर केला नाही. उलट वरिष्ठांचं तुमच्याबद्दलचं मत वाईट झालं आहे. त्यामुळे काय ते तुम्ही समजून जा, असं एका नेत्याने मला खासगीत बोलताना सांगितलं, असा दावा खडसे यांनी केला.

फडणवीस काय म्हणाले होते?

काल अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे औरंगाबादला आले होते. संध्याकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. खडसेंबद्दल बोलताना त्यांना माझ्याविषयी काही तक्रारी होत्या तर त्यांनी वरिष्ठांशी बोलायला हवं होतं, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, माझ्या संपर्कात भाजपचे 10-12 आमदार आहेत. पक्षांतर बंदी कारणामुळे आमदार तूर्तास सोबत येणार नाही. निवडणुकाही त्यांना परवडणार नाहीत. पण भाजपचे 10-12 माजी आमदारही माझ्या संपर्कात असून त्यापैकी दोन-चार माजी आमदार उद्या माझ्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करतील. नगराध्यक्ष आणि सहकार क्षेत्रातील पदाधिकारी उद्या माझ्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असंही खडसे यांनी सांगितलं.

पाटील वगळता कुणीही संपर्क साधला नाही

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील वगळता माझ्याशी कुणीही संपर्क साधलेला नाही. तेही एका कार्यकर्त्याने सांगितलं म्हणून पाटलांनी संपर्क साधला. त्यामुळे पक्षात राहण्यासाठी माझी मनधरणी करण्यात आली यात काही तथ्य नाही, असंही ते म्हणाले.

‘त्या’ पादुका परत मागणार

नाथाभाऊंच्या पादुका घेऊनच मी काम करत आहे, असं चंद्रकांत पाटील सांगत असतात. त्यांनी या पादुका मला अजून दिलेल्या नाहीत. त्यांच्याकडून या पादुका मी परत घेणार आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

दहा बारा जणांवर गुन्हे, मग माझ्यावरच अन्याय का?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दहा-बारा जणांवर गुन्हे होते. एका मंत्र्याचं प्रकरण तर सीबीआयकडे होतं. तरीही सर्वांना क्लिन चीट मिळाली. मग माझ्यावरच अन्याय का?, असा सवाल करतानाच मला क्लिन चीट द्यावी असं माझं म्हणणं नाही. पण माझा दोष काय? हे तरी मला सांगायला हवं ना. त्याचं उत्तर मला आजपर्यंत मिळालेलं नाही, असं त्यांनी सांगितलं. (i raised my complaint front of narendra modi and amit shah, says eknath khadse)

संबंधित बातम्या:

…म्हणून मला नाईलाजाने फडणवीसांचं नाव घ्यावं लागलं : एकनाथ खडसे

Eknath Khadse Exclusive | अजित पवारांसोबत पहाटे शपथविधी ही नैतिकता, मी राष्ट्रवादीत गेलो तर अनैतिकता का? खडसेंचा फडणवीसांना सवाल

भाजपमधील सामूहिक नेतृत्त्व संपलंय, आता एकाधिकारशाहीने निर्णय घेतले जातात- खडसे

(i raised my complaint front of narendra modi and amit shah, says eknath khadse)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.