Sada Saravankar : काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर काय बोलणं झालं? सरवणकर म्हणाले…

Sada Saravankar : सध्या राज्यात माहीम विधानसभा मतदारसंघाची चर्चा आहे. माहीमध्ये बिग फाईट आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी मनसेकडून राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे रिंगणात आहेत. अमित ठाकरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी सरवणकरांवर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला जातोय. आता सरवणकर या विषयावर स्पष्टपणे बोलले आहेत.

Sada Saravankar : काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर काय बोलणं झालं? सरवणकर म्हणाले...
Amit Thackeray vs Sada Sarvankar
Follow us
| Updated on: Nov 01, 2024 | 12:31 PM

‘दिवाळी जोरात साजरी करतोय. फराळ सुद्धा गोड लागतोय’ असं पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सदा सरवणकर म्हणाले. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने सदा सरवणकर यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर मनसेच्या अमित ठाकरेंच आव्हान आहे. सदा सरवणकर यांनी आता उमेदवारी मागे घ्यावी, असा महायुतीकडून प्रयत्न सुरु आहे. त्यावर सदा सरवणकर बोलले आहेत. “काल रात्री मी वर्षावर गेलो होतो, हे नक्की. पण बैठक झाली नाही. मला वेळ मिळतो, तेव्हा मी वर्षावर जात असतो. मी वर्षा बंगल्यावर गेलो, त्यावेळी मुख्यमंत्री विश्रांती घेत होते. त्यांच्या स्टाफशी गप्पा मारल्या” असं आमदार सदा सरवणकर म्हणाले.

‘मी उमेदवार मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. मी निवडणूक लढणार आहे’ हे सदा सरवणकर यांनी स्पष्ट केलं. तुम्ही पुढचे काही दिवस प्रचार करणार नाही, या पत्रकारांच्या प्रश्नावर सदा सरवणकर म्हणाले की, “असं तुम्हाला कोणी सांगितलं? मी सुरुवात केली. आज माझी बैठक आहे. दिवाळीच्या काळात कोणाच्या दारात जाणं योग्य नाही” विधान परिषदेवर जाणार का? त्यावर ते म्हणाले की, ‘मी लढणारा शिवसैनिक आहे. मी मागच्या दाराने जाणार नाही’ “मी मुंबईतला आमदार आहे. वर्षा बंगल्यावर जात असतो, गेल्यावर प्रत्येकवेळी भेटतो असं नाही” असं सरवणकर यांनी सांगितलं.

‘नागपूरमध्ये फडणवीस काय बोलले, ते पण सांगाना’

माहीममध्ये महायुतीने मनसेला पाठिंबा द्यावा असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांची सुद्धा तशीच इच्छा आहे, असं त्यांनी सांगितलं. तुमची भूमिका काय? यावर सदा सरवणकर म्हणाले की, “तुम्ही काही गोष्टी तुमच्या सोयीनुसार टाळता. नागपूरमध्ये फडणवीस काय बोलले, ते पण सांगाना. महायुतीचा धर्म पाळणार. महायुतीचा उमेदवार, हाच आमचा उमेदवार असणार असं फडणवीस यांनी सांगितलं”

‘हे सांगणं हास्यास्पद आहे’

भाजपाचा मुख्यमंत्री मनसेच्या मदतीने होईल असं अमित ठाकरे म्हणाले. त्यावर “व्यक्तीगत मतं असतात. ज्यांचा एकही आमदार नाही, त्यांनी मुख्यमंत्री कोणाचा होणार? हे सांगणं हास्यास्पद आहे. मी त्यांच्यावर टीका करावी, असं मला वाटत नाही. मी महायुतीचा उमेदवार म्हणून या मतदारसंघात उभा आहे आणि निवडून येणार” असं सरवणकर म्हणाले.

सदा सरवणकर एकटे पडलेत का?

राजपुत्राला तिकीट मिळाल्यामुळे सदा सरवणकर एकटे पडलेत का? त्यावर सरवणकर म्हणाले की, “मी एकटा पडण्याचा प्रश्नच येत नाही. मला जनता जर्नादनाचा, मतदारांचा आशिर्वाद आहे” मी निवडणूक लढवणार. कार्यकर्त्यांची इच्छा मोडता येणार नाही. सर्वसामान्य मतदारांसाठी जिंकून यावं लागेल.

Non Stop LIVE Update
शायना एनसींना माल संबोधल आता स्पष्टीकरण दिल, काय म्हणाले अरविंद सावंत?
शायना एनसींना माल संबोधल आता स्पष्टीकरण दिल, काय म्हणाले अरविंद सावंत?.
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'.
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट.
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल.
महायुतीचं सरकार येणार अन् मोठं पद मिळणार, अजितदादा नेमकं काय म्हणाले?
महायुतीचं सरकार येणार अन् मोठं पद मिळणार, अजितदादा नेमकं काय म्हणाले?.
माल संबोधल्याने एनसी यांचा राग अनावर, उबाठाच्या खासदाराला धरलं धारेवर
माल संबोधल्याने एनसी यांचा राग अनावर, उबाठाच्या खासदाराला धरलं धारेवर.
'कोणाचा दबाव?', राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं तर फडणवीसांनी मानले आभार
'कोणाचा दबाव?', राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं तर फडणवीसांनी मानले आभार.
दिवाळीत राजकीय 'फटाके', 23 तारखेला कोणाचा बॉम्ब फुटणार? नेत्यांचे दावे
दिवाळीत राजकीय 'फटाके', 23 तारखेला कोणाचा बॉम्ब फुटणार? नेत्यांचे दावे.
जरांगेंच्या M फॅक्टरमुळं कोणाची पडणार विकेट? विधानसभेसाठी समीकरण ठरलं
जरांगेंच्या M फॅक्टरमुळं कोणाची पडणार विकेट? विधानसभेसाठी समीकरण ठरलं.
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'.