Belgaum Bypoll: ‘देवेंद्र फडणवीस बेळगावात प्रचाराला आले तर ते महाराष्ट्रद्रोही असल्याचे सिद्ध होईल’

भाजपकडे मुद्दे काहीच नाहीत. त्यामुळे मराठी मतांमध्ये फूट पाडण्याची त्यांची खेळी आहे. | devendra fadnavis belgaum bypoll

Belgaum Bypoll: 'देवेंद्र फडणवीस बेळगावात प्रचाराला आले तर ते महाराष्ट्रद्रोही असल्याचे सिद्ध होईल'
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेता
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 12:53 PM

बेळगाव: देवेंद्र फडणवीस हे बेळगाव पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी आले तर ते महाराष्ट्रद्रोही असल्याचे सिद्ध होईल, असे वक्तव्य महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी केले. गेल्यावेळी आम्ही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सीमाप्रश्नी सकारात्मक भूमिका घेतली होती. तेव्हा आताच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचा महाराष्ट्रातील कोणताही नेता प्रचारासाठी येणार नाही, असं आम्हाला वाटलं होतं. पण तसे झाले तर तो नेता महाराष्ट्रद्रोही आणि मराठीद्रोही असल्याचे सिद्ध होईल, असे शुभम शेळके यांनी सांगितले. (Belgaum Bypoll Maharashtra Ekikaran Samiti candidate Shubham Shelke take a dig at BJP)

शुभम शेळके यांनी गुरुवारी बेळगावात ‘टीव्ही 9 मराठी’शी खास संवाद साधला. बेळगावातील मराठी जनता जागी झाली आहे. भाजपकडे मुद्दे काहीच नाहीत. त्यामुळे मराठी मतांमध्ये फूट पाडण्याची त्यांची खेळी आहे. पण मराठी माणसांचे डोळे उघडले आहेत. राष्ट्रीय पक्षांचा ढोंगीपणाचा बुरखा फाटला आहे. त्यांच्या डावपेचांचा मराठी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीवर काहीही फरक पडणार नाही, असे शुभम शेळके यांनी म्हटले.

‘महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात प्रचारासाठी येणं दुर्दैवी’

बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मराठी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी महाराष्ट्रातून राष्ट्रीय पक्षाच्या प्रचाराला कोणत्याही नेत्याने येऊ नये, असं आम्ही यापूर्वी कळवलं होतं. बाकीच्या पक्षांकडून तसा प्रतिसाद आला. मी अपेक्षा व्यक्त केली होती की, महाराष्ट्र भाजपमधून कुणी येऊ नये. पण आता तसं होत असेल तर दुर्दैवी आहे, असे शुभम शेळके यांनी म्हटले.

राऊतांच्या ‘त्या’ आवाहनानंतर गडकरींचा बेळगाव दौरा रद्द?, पण देवेंद्र फडणवीस प्रचाराला जाणार

बेळगावातील मराठी बांधवांना मदत करता येत नसेल तर किमान मराठी मतदारांमध्ये तोडफोड करु नका, या संजय राऊत यांच्या आवाहनानंतर भाजप नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा बेळगाव रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी गडकरींचा दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, त्याऐवजी आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी बेळगावात भाजपच्या प्रचारासाठी येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

बेळगाव पोटनिवडणुकीसाठी रिंगणात कोण?

भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी, तर कॉंग्रेसतर्फे आमदार सतीश जारकीहोळी रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेतर्फे के. पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे बेळगाव पोटनिवडणुकीची लढत तिरंगी झाली आहे.

संबंधित बातम्या :

‘भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात ठेवून दांडा घालू’, संजय राऊतांचा कन्नडिगांना थेट इशारा

Special Report | बेळगाव पोटनिवडणूक, वर्षोंवर्षांपासून कानड्यांचा अत्याचार, महाराष्ट्रात सामील होण्यासाठी चाचपडणाऱ्या शेकडो गावांची कहाणी

बेळगाव प्रशासनाला संजय राऊतांची धास्ती, स्टेज, साऊंड सिस्टिमची मोडतोड! राऊतांचा कडक शब्दात इशारा

(Belgaum Bypoll Maharashtra Ekikaran Samiti candidate Shubham Shelke take a dig at BJP)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.