Sadabhau Khot:’फडणवीसांनी सांगितले तर सदाभाऊ साडी घालून…’ , केतकी चितळे प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बोचरी टीका
केतकीच्या वडिलांना नसेल इतका त्या पोस्टच्या अभिमान सदाभाऊ खोत यांना असेल अशी जोरदार टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केली आहे.
मुंबई – अभिनेती केतकी चितळे (Ketaki Chitale)हिच्या पोस्टवरुन राज्यातील वातावरण तापलेले असतानाच, तिची बाजू घेणाऱ्या सदाभाऊ खोतांवर (Sadabhau Khot)राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP criticize)नेत्यांनी टीकेची राळ उठवली आहे. केतकीच्या वडिलांना नसेल इतका त्या पोस्टच्या अभिमान सदाभाऊ खोत यांना असेल अशी जोरदार टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केली आहे. आमराकीसाठी हपापलेले सदाभाऊ खोत हे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले तर साडी घालून सिग्नलवर नाचतीलही अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.
सदाभाऊ खोत हे आमदारकीसाठी केतकीचं समर्थनच काय फडणवीसानी सांगलीतले तर साडी घालून सिग्नलवर पण नाचतील.
हे सुद्धा वाचा— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) May 16, 2022
सदाभाऊ खोत काय म्हणाले
सुरुवातीला सदाभाऊंनी केतकी चितळेनी केलेल्या पोस्टचा अभिमान असल्याचे म्हटले होते, त्यानंतर या प्रकरणात सारवासारव करत पोस्ट व्हायरल केली त्याचं समर्थन करत नाही. मात्र तिने खंबीरपणे कोर्टात स्वताची बाजू स्वता मांडली, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतरही तिच्यावर जो हल्ला झाला तो अशोभनीय आहे. अशी भूमिका घएतली होती. ती पोलिसांच्या ताब्यात असताना गुन्हेगारावर हल्ला होत असेल तर कायदा सुव्यवस्थेवरचा विश्वास संपेल. असे मत त्यांनी मांडले आहे.
राष्ट्रवादीच्या प्रतिक्रियांवर कारवाई का नाही –सदाभाऊंचा सवाल
राष्ट्पवादीवर टीका करणाऱअयांना फोडा आणि तोडा असे पत्रक काढते, अमोल मिटकरी ब्राह्मण समाजावर खालच्या भाषेत टीका करतात, मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल का होत नाहीत, गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्ला होता, दगड टाकावासा वाटतो, त्याचा निषेध का होत नाही, त्यांचा सत्कार होतो, तो अन्याय वाटत नाही.का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीसांवर, चंद्रकांत पाटलांवर एकरी भाषेत टीका झाली, तेव्हा यांनी नियम घालून घेतले नाहीत, सत्तेत आहेत त्यांना लायसन परमिट आहे का, असा प्रश्न सदाभआऊंनी विचारला आहे. छत्रपती संभाजीराजेंना खासदारकी दिली तेव्हा आता पेशवे छत्रपतींना पगड्या घातल आहेत, या केलेल्या वक्तव्यांची आठवणही त्यांनी करुन दिली आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांचे जोरदार प्रत्युत्तर
भाजपासह सर्वच राजकीय पक्षांनी या पोस्टचा निषेध केलेला असताना सदाभाऊ खोत यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर राष्ट्रावदीच्या नेत्यांनी सदाभाऊंवर जोरदार टीका केली आहे. शरद पवार हे पक्षासाठी आणि राज्यासाठी एवढए काम करत असताना, अशी टीका अयोग्यच आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. भाजपा यानिमित्ताने जातीचे राजकारण करीत आहे, हे विकृतीचे राजकारण असल्याची टीका राष्ट्रवादीने केली आहे.
सदाभाऊ आमदारीकीसाठी हपापलेले -राष्ट्रवादी
सदाभाऊंना आमदारकी हवी आहे, त्यामुळे ते या प्रकरणात भूमिका घेत असल्याची टीका राष्ट्रवादीकडून करण्यात येते आहे. जर उद्या फडणवीसांनी सांगितले तर ते साडी घालून सिग्नलवर नाचतीलही, असे ट्विट काढून सूरज चव्हाण यांनी या प्रकरणात संताप व्यक्त केला आहे.