Arvind Kejriwal : ‘…तर उद्धव ठाकरे तुरुंगात दिसतील’, अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या जामिनावर बाहेर आले आहेत. त्यांना सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केलाय. त्यांच्या सुटकेमुळे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना मोठं बळ मिळालय. आज अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर आरोप करताना भविष्यासंबंधी काही दावे केले आहेत.

Arvind Kejriwal : '...तर उद्धव ठाकरे तुरुंगात दिसतील', अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा
Arvind kejriwal
Follow us
| Updated on: May 11, 2024 | 2:06 PM

दारु घोटाळा प्रकरणात अटक झालेल्या अरविंद केजरीवाल यांची काल तिहार तुरुंगातून सुटका झाली. 1 जून पर्यंत अंतरिम जामिनावर केजरीवाल बाहेर आले आहेत. 2 जूनला पुन्ह त्यांना तुरुंग प्रशासनासमोर आत्मसमर्पण कराव लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करताना निवडणूक प्रचारासंदर्भात कुठलीही बंधन घातलेली नाहीत. अरविंद केजरीवाल निवडणूक प्रचार, पत्रकार परिषदा घेऊ शकतात असं कोर्टाने म्हटलं आहे. त्यानुसार अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील सर्व नेत्यांना संपवायच आहे. विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना तुरुंगात पाठवतील. माझ्याकडून तुम्ही एफिडेविट लिहून घ्या, हे लोकसभेची निवडणूक जिंकले, तर थोड्याच दिवसात उद्धव ठाकरे, ममता बनर्जी, तेजस्वी यादव आणि स्टालिन तुरुंगात दिसतील” असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. “यांनी भाजपाच्या एका नेत्याला सोडलं नाही. शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे, मनोहर लाल खट्टर यांचं राजकारण संपवलं. हे लोकसभेची निवडणूक जिंकले, तर पुढच्या दोन महिन्यात उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री बदलतील” असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

‘पुढच्या वर्षी 17 सप्टेंबरला मोदी निवृत्त होत आहेत, मग….’

“मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो. मी देशभर फिरणार आहे. माझं तन, मन, धन देशासाठी कुरबान आहे. भाजपमध्ये 75 वर्षानंतर निवृत्ती आहे, अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन यांना निवृत्त केलं, पुढच्या वर्षी 17 सप्टेंबरला मोदी निवृत्त होत आहेत, मग भाजपला मी विचारतो प्रधानमंत्री पदाचा दावेदार कोण आहे? जर यांचं सरकार आलं, तर योगीना डावलून अमित शहा यांना पंतप्रधान केलं जाईल” असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

‘सट्टा बाजारानुसार 220 जागा येऊ शकतात’

“तुरुंगातून बाहेर आल्यावर गेल्या 20 तासात मी देशभरातल्या अनेक लोकांशी बोललो, त्यावरून असा अंदाज येतो की 4 जून नंतर भाजपचं सरकार बनणार नाही. सगळ्या राज्यात भाजपच्या जागा कमी होणार आहेत. सट्टा बाजारानुसार 220 जागा येऊ शकतात. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार” असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.