हिंमत असेल तर केंद्रातील सरकार बरखास्त करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, नाना पटोलेंचं आव्हान

भाजपचा समाचार घेताना नाना पटोले पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते सैरभैर झालेत. दोन वर्ष वारंवार हे सरकार पाडण्यासाठी भाजपाने अनेक प्रयत्न केले, राजभवनाच्या माध्यमातूनही प्रयत्न करून काही उपयोग झाला नाही.

हिंमत असेल तर केंद्रातील सरकार बरखास्त करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, नाना पटोलेंचं आव्हान
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 7:07 PM

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून पुन्हा निवडणुका घ्या, या भारतीय जनता पक्षाच्या आव्हानाला काँग्रेसनेही प्रतिआव्हान दिलेय. भाजपमध्ये हिंमत असेल तर केंद्रातील सरकार बरखास्त करून बॅलेटपेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, असे प्रतिआव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेय.

दोन वर्ष वारंवार हे सरकार पाडण्यासाठी भाजपाचे अनेक प्रयत्न

भाजपचा समाचार घेताना नाना पटोले पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते सैरभैर झालेत. दोन वर्ष वारंवार हे सरकार पाडण्यासाठी भाजपाने अनेक प्रयत्न केले, राजभवनाच्या माध्यमातूनही प्रयत्न करून काही उपयोग झाला नाही. सीबीआय, ईडी, आयकर, एनसीबी सारख्या केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातूनही मविआ सरकारमधील मंत्री व नेत्यांवर खोट्या केसेसच्या टाकून कारवाई करण्यात आली, महाराष्ट्राला बदनाम केले परंतु सरकार पडत नाही उलट ते भक्कम झाले आहे हे पाहून भाजपा नेत्यांना नैराश्याने ग्रासले आहे. या नैराश्येतूनच महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करण्याची भाषा केली गेली आहे. पण भाजपात हिम्मत असेल तर केंद्र सरकार बरखास्त करुन बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात, भाजपाचा पराभव नक्की होईल, असंही नाना पटोले म्हणालेत.

भाजपा एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान करतेय

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, भाजपा एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान करत आहे. भाजपा सत्तेत असताना एसटी विलिनीकरणाविरोधात भूमिका घेतली होती आणि आता तेच मागणी करत आहेत. केंद्रात सत्तेत असलेले भाजपाचे सरकार एलआयसी, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, भेल, अशा सरकारी कंपन्या उद्योगपतींना विकत आहे आणि येथे मात्र एसटीचे विलीनीकरण करण्याची भूमिका घेत आहे ही भाजपची भूमिका दुटप्पी आहे, असे नाना पटोले म्हणाले.

संबंधित बातम्या

‘मिशन नवाब मलिक’ कसं राबवलं?, एक व्हिडीओ कॉल केला अन्… चंद्रकांतदादांनी सांगितला प्लान

ठाकरे सरकारकडून राजकारणाचे गुन्हेगारीकरण; आशिष शेलारांनी केला आघाडीचा पंचनामा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.