Suresh Dhas : ‘ठॉय, ठॉय थांबलं पाहिजे’, जिल्हाधिकाऱ्यांना भेटल्यानंतर सुरेश धस आक्रमक
Suresh Dhas : बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बंदुकांना परवाने देण्यात आले आहेत. आज या विषयावर आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली. त्यानंतर सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला. "कोणत्या एसपीच्या काळात सर्वाधिक परवाने दिले त्याचे नाव आणि यादी मागवली आहे"
“बीड जिल्ह्यात बंदुकीचे परवाने भाजपील्यासारखे, चिरीमिरीसारखे वाटले आहेत. ते कोणीही लोक असोत, त्या लोकांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे” अशी मागणी आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी केली. ते आज जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना भेटले. त्यानंतर सुरेश धस माध्यमांशी बोलत होते. “भाजपाल्यासारखे किंवा चिरीमिरीसारखे शस्त्र परवाने दिले आहेत. ते रद्द करावेत. 105 परवाने रद्द झाले आहेत. दहा-बारा परवाने बँकांशी संबंधित आहेत. राहिलेले हजार परवान्यांचा रिव्ह्यू घेऊन लवकरात लवकर रद्द करू असं आश्वासन जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिलं आहे” असं आमदार सुरेश धस म्हणाले. “कोणत्या एसपीच्या काळात सर्वाधिक परवाने दिले त्याचे नाव आणि यादी मागवली आहे. यादी मिळाल्यावर चिरीमिरी घेऊन एसपी आणि डीवाएसपी अग्निशस्त्र परवाने दिले असेल तर बिहारच्या पुढचं काबुलिस्तान झाल्याची वेळ आली आहे” असं सुरेश धस म्हणाले.
“लग्नात आल्यावर बंदूक दाखवतो. लक्ष्मीपूजन, आणि ढाब्यावर ठॉय ठॉय केलं जात आहे. हे सर्व थांबलं पाहिजे. सर्व परवाने रद्द करावे. नाही केलं तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. जिल्हाधिकारी आमचे मित्र आहे. पण दुर्देवाने कारवाईची मागणी करावी लागेल” असं सुरेश धस यांनी सांगितलं. “ज्यांनी शिफारसी केल्या आहेत. तेही बाहेर यावं. माझा फोन आला असेल शस्त्र परवान्यासााठी तर माझ्यावरही कारवाई करावी. मी आयुष्यात पिस्तुल वापरली नाही. त्यामुळे मी दुसऱ्यांसाठी शिफारस करण्याचा प्रयत्न केला नाही. टुवेल बोअर आणि जंगलात राहण्यासाठी बंदुकीची परवानगी मिळावी म्हणून मी शिफारस केली होती. फक्त दोनच शिफारसी केल्या होत्या” असं सुरेश धस यांनी सांगितलं.
राखेच्या धंद्यासाठी पुरावे लागतात का?
“एसपी बंदूक दाखवणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. भाजीपाल्यासारखे परवाने दिले की चणे फुटाण्यासारखे दिले हे पोलीस पाहतील. मुंबईतही एवढे परवाने नसतील तर इथेच का मिळाले?” असा सवाल सुरेश धस यांनी विचारला. “तुम्हालाच का एवढे परवाने मिळाले. राखेच्या धंद्यासाठी पुरावे लागतात का? माझ्याकडे काही पुरावे आले आहेत. हे पिस्तूल प्रकरणावर जिल्हाधिकारी कारवाई करतील यावर विश्वास आहे” असं सुरेश धस म्हणाले.