Ajit Pawar NCP Candidate List : अजित पवार पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर, किती लाडक्या बहिणींना उमेदवारी ?

Ajit Pawar NCP Candidate List : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत अजित पवारांनी किती लाडक्या बहिणींना उमेदवारी दिलीय? ते जाणून घ्या. अजित पवार सतत निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल बोलत असतात, प्रचार करतात.

Ajit Pawar NCP Candidate List : अजित पवार पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर, किती लाडक्या बहिणींना उमेदवारी ?
अजित पवार
Follow us
| Updated on: Oct 23, 2024 | 1:47 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत अजित पवार गटाने 38 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. महायुतीमधील तिन्ही घटक पक्ष भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिघांनी उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत. दुसऱ्याबाजूला महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाकडून अजून उमेदवारी यादी जाहीर झालेली नाही. भाजपाने पहिल्या यादीत 99, शिवसेना शिंदे गटाने 45 आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 38 जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीने आतापर्यंत 288 पैकी 182 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. अजित पवार यांनी आधी देवगिरी बंगल्यावर बोलवून काही उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते. आता महायुतीमधील तिन्ही पक्षांच एकमत असलेल्या जागांवर तिन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. म्हणजे अजून 106 जागांवर उमेदवार जाहीर होणं बाकी आहे.

अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री आहेत. त्यांनीच यंदाच बजेट मांडताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर केली. या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरु शकते. या योजनेमुळे लोकसभेला झालेली हानी भरुन निघेल असा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यारुपाने फक्त एक खासदार निवडून आला होता.

अजित पवारांनी किती महिलांना उमेदवारी दिली?

विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधी आणि जाहीर झाल्यानंतर अजित पवार यांच्या पक्षातून बऱ्याच जणांनी तुतारी हाती घेतली. शरद पवार गटाकडे राष्ट्रवादीमधील अनेक जणांचा ओढा वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रचारावर भर दिला. अनेक मतदारसंघात ही योजना त्यांनी प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला. विरोधकांवर तोंड सुख टाळून त्यांनी फक्त सकारात्मक मुद्यांवर लाडकी बहिण योजनेच्या प्रचारावर भर दिला. आता विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना अजित पवारांनी किती महिलांना तिकीट दिलीय ते जाणून घेऊया. अजित पवारांनी पहिल्या उमेदवार यादीत चार महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच तिकीट दिलय. श्रीवर्धमधून आदिती तटकरे, नाशिक देवळालीमधून सरोज आहिरे, अमरावती शहरमधून सुलभा खोडके आणि पाथरी येथून निर्मला उत्तमराव विटेकर यांना तिकीट दिलय.

Non Stop LIVE Update
निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ येथे पक्षप्रवेशाची जय्यत तयारी
निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ येथे पक्षप्रवेशाची जय्यत तयारी.
महायुतीतून भाजपचे 99, शिंदेचे 45 उमेदवार जाहीर, या 18 जागांवर पेच कायम
महायुतीतून भाजपचे 99, शिंदेचे 45 उमेदवार जाहीर, या 18 जागांवर पेच कायम.
'संजय राऊत हा कुत्र्यासारखा...', शहाजी बापू पाटलांची घसरली जीभ
'संजय राऊत हा कुत्र्यासारखा...', शहाजी बापू पाटलांची घसरली जीभ.
दादांच्या राष्ट्रवादीकडून पहिली यादी जाहीर, 'या' 38 उमेदवारांना संधी
दादांच्या राष्ट्रवादीकडून पहिली यादी जाहीर, 'या' 38 उमेदवारांना संधी.
शिंदे-भाजपात 5 जागांचा वाद, 2019 ला बंडानं खेळखंडोबा, यंदा काय होणार?
शिंदे-भाजपात 5 जागांचा वाद, 2019 ला बंडानं खेळखंडोबा, यंदा काय होणार?.
तिकीटासाठी पक्षाशी बंड अन् एकाच घरात दोन पक्ष, वडील एका पक्षात तर...
तिकीटासाठी पक्षाशी बंड अन् एकाच घरात दोन पक्ष, वडील एका पक्षात तर....
5 कोटी जप्त, शहाजी बापूंवर आरोप मात्र कारचं कनेक्शन नेमकं कोणाशी?
5 कोटी जप्त, शहाजी बापूंवर आरोप मात्र कारचं कनेक्शन नेमकं कोणाशी?.
'लाडकी बहीण' विरोधात अनिल वडपल्लीवारांची याचिका, कोर्टाचे निर्देश काय?
'लाडकी बहीण' विरोधात अनिल वडपल्लीवारांची याचिका, कोर्टाचे निर्देश काय?.
शिंदेंच्या पहिल्या यादीत 45 जणांपैकी या 6 उमेदवारांना पहिल्यांदा संधी
शिंदेंच्या पहिल्या यादीत 45 जणांपैकी या 6 उमेदवारांना पहिल्यांदा संधी.
शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, 45 जणांना उमेदवारी, कोणाला संधी
शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, 45 जणांना उमेदवारी, कोणाला संधी.